भारत-पाकिस्तान बॉर्डर ही एक खूप संवेदनशील आणि धोकादायक मानले जाते. पण हीच धोकादायक भारत-पाक बॉर्डर अंतराळातून किती शानदार, अद्भूत आणि लाजवाब दिसतेय याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) ने अंतराळातून रात्रीच्या वेळी चकाकणाऱ्या पृथ्वीचे काही शानदार फोटोज शेअर केले आहेत.

अंतराळातून पृथ्वी कशी दिसते ? हे तुम्ही एखाद्या व्हिडीओमध्येच पाहिलं असेल. पण आयएसएसच्या अंतराळवीरांनी कैद केलेले पृथ्वीचे काही विलोभनीय दृश्य त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात भारत पाक सीमेचा रात्री घेतलेला फोटो आहे. हा खास फोटो अंतराळातून घेण्यात आला आहे. हा फोटो अंतराळ प्रवाशाने इंटरनॅशनल स्पेस सेंटरवरून काढला आहे. यात भारत वायव्येला दिसत आहे. भारतात खूप प्रकाश आहे.

आयएसएसने एकूण चार फोटोज शेअर केलेल आहेत. पृथ्वीचे सर्वांत दुरून काढलेले दोन फोटोज दिसून येत आहेत. या दोन्ही फोटोमध्ये पृथ्वी अजूनही विशाल अंतराळात एकमेव, चमकदार निळा रंगाने सजलेली दिसून येत आहे. तिच्या भोवती हवेच्या कणांची एक रिंगदेखील दिसून येतेय.

आणखी शेअर केलेल्या दोन फोटोमध्ये एक नारंगी रंगाची चमकती पट्टी दिसत आहे. ती भारत पाक बॉर्डर आहे. नारंगी रंगात चमकणारी ही पट्टी भारत पाक बॉर्डरवर या सिक्योरिटी लाइट्सची आहे. भारत पाक ही काही निवडक सीमांपैकी आहेत. त्या अंधार पडल्यानंतरही स्पष्टपणे दिसतात. हा संपूर्ण भाग रात्रीच्या अंधारातही चमकतो.

भारत आणि पाकिस्तान सीमेवर फायरिंग आणि गोळीबाराचे कर्णकर्कश आवाज आपल्या नेहमी ऐकायला मिळतात. पण हीच बॉर्डर अकाशातून इतकी अद्भूत दिसते हे पाहून नेटिझन्स आश्चर्य होताना दिसून येत आहेत.

आयएसएसने हे फोटोज शेअर करताना नासा जॉन्सन यांच्या फ्लिकवरील फोटो गॅलरीची लिंक देखील जोडली आहे. यात टिपलेल्या एका फोटोमध्ये इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम आणि फ्रान्स ही शहरं लाईट्सने चकाकताना दिसून येत आहेत. तर दुसरा फोटो हा अफगाणिस्तानवरून प्रदक्षिणा करत असताना घेण्यात आला आहे.

ISS आणि NASA हे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळातील वेगवेगळे आकर्षक आणि विलोभनीय फोटोज शेअर करत असतात. अलीकडच्या एका ‘कॉस्मिक रोझ’ पासून ते ब्लॅक होल ‘त्सुनामी’ पर्यंत सर्व पोस्ट अनेकदा नेटिझन्सची उत्सुकता वाढवत असतात.

ISS ने शेअर केलेल्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर जवळपास १ लाख २० हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसंच ट्विटरवर देखील हजारो रीट्वीट देखील मिळाले. सोबतच भारत पाक बॉर्डरचा हा सुंदर नजारा पाहून नेटकरी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.