Indian Cobra Shocking Video Viral : इंडियन कोब्रा सर्वात विषारी सापांमध्ये अव्वल स्थानी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इंडियन कोब्राने चावा घेतल्यावर जीव वाचण्याची शक्यता धुसर असते. पण काही माणसं या कोब्रा सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुण कोब्राच्या जवळ जाऊन त्याच्याशी मस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण काही सेकंदात नाग पिसाळतो अन् फणा मारतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
खतरनाक कोब्राच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंडियन कोब्राच्या जवळ जाऊन एक तरुण त्याला स्पर्श करण्याची हिंम्मत करतो. पण काही सेकंदातच कोब्रा फणा काढून त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. @therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर इंडियन कोब्राचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
इथे पाहा नागाचा खतरनाक व्हिडीओ
इंडियन कोब्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, कोब्रा क्लास सुरु आहे. मलाही काही टीप्स द्या. दुसऱ्या एकाने म्हटलं, वाचला तू, नशीब त्याने तुला चावा घेतला नाही. अन्य एक यूजर म्हणाला, मृत्यूला आमंत्रण देण्याचा सोपा मार्ग. कोब्रासोबत खेळू नका..सापाशी खेळू नका..अशीही प्रतिक्रिया एका यूजरने दिली.