वजन उचलणे म्हणजेच वेटलिफ्टिंगमधील हा खेळाचा एक प्रकार आहे. अनेक मोठ्या वयाच्या लोकांना लाजवेल इतक्या सफाईने नऊ वर्षांच्या अर्शिया गोस्वामीने तब्ब्ल ७५ किलोचे डेडलिफ्ट केले असल्याचे तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. अर्शिया ही भारतातील सर्वांत लहान डेडलिफ्ट करणारी मुलगी असून, तिच्याकडे इतक्या लहान वयातच जागतिक रेकॉर्ड आणि आशिया रेकॉर्ड असल्याचे तिच्या अकाउंटवरून समजते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये प्रथम अर्शिया ७५ किलो वजनाच्या मागे उभी आहे, असे आपल्या दिसते. त्यानंतर क्षणात एक दीर्घ श्वास घेऊन, समोर असलेले वजन संपूर्ण ताकदीनिशी उचलते आणि काही सेकंद तसेच धरून ठेवते; मग शेवटी सोडून देते. वजन उचलताना अर्शियाचे प्रशिक्षक तिला मोठ्याने ओरडून खूप प्रोत्साहन देत असल्याचे आपण ऐकू शकतो.

हेही वाचा : हडप्पा संस्कृतीमध्ये झाला का वांग्याच्या भाजीचा उदय? वाचा शेफ कुणाल कपूरने दिलेली माहिती….

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला “कोणत्याही गाण्याची आवश्यकता नाही! भारतातील सर्वांत तरुण व शक्तिशाली मुलगी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.

“बापरे लालबुंद झाला होता चेहरा! खूप भारी!” असे एकाने लिहिले आहे.
“या वयात एवढ्या सहजतेनं वेटलिफ्टिंग करणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे”, असे दुसऱ्याने लिहिलेय.
“बापरे! इथे १० किलो वजन उचलणे अशक्य आहे”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.
“त्यासाठी पालकांचा पाठिंबा असणे खूप गरजेचे आहे”, अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली.
“पण एवढ्या लहान वयात इतके जड वजन उचलण्याचा तिला त्रास नाही का होणार,” असा प्रश्न पाचव्याने विचारला आहे.

Solar eclipse 2024 Video : सूर्यग्रहणाने दिपले विमान प्रवाशांचे डोळे! विमानातून कसे दिसले ग्रहण; पाहा ही झलक

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @fit_arshia नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ११.५ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.