Apple Event 2025: भारतातील नामांकित कंपनी अॅपलने आज, ९ सप्टेंबर रोजी Awe Dropping 2025 या लाँच सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी अॅपल आयफोन १७ सीरिज, नवीन अॅपल वॉच आणि एअर पॉड्ससह नवीन उत्पादने सादर करीत आहे. यावर्षी आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १७ एअर या उत्पादनांचं लाँच करण्यात येणार आहे. अधिकृत लाँच झाल्यानंतर आयफोन्सच्या प्री-ऑर्डर सुरू होण्याची अपेक्षा आहे. आयफोन १७ एअर स्मार्टफोन हा आयफोन १७ सीरिजमधील एक मोठं आकर्षण असणार आहे. हा अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम बॉडी फोन असेल. कंपनी प्लस मॉडेल वगळून आयफोन १७ एअर आणत आहे असे बोलले जात आहे.
अॅपलचे सीईओ टीम कुक त्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करतील. त्यानंतर या सीरिजची घोषणा केली जाईल. अॅपलच्या कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा लाँच सोहळा मंगळवारी रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम अॅपलच्या यूट्यूब चॅनेल तसंच एक्स अकाउंट आणि वेबसाइटवर थेट पाहता येणार आहे.
या कार्यक्रमात अॅपल १७ सीरिजची कोणती उत्पादनं सादर केली जातील?
आयफोन १७
या मॉडेलमध्ये ६.३ इंचाचा १२० Hzचा डिस्प्ले आणि हाय-रिझोल्यूशनचा २४ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हे मॉडेल जांभळ्या आणि हिरव्या अशा दोन नवीन रंगांमध्ये सादर होईल असं बोललं जात आहे. आयफोन १७ च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ७० हजार ३८१ रूपयांपासून सुरू होऊ शकते. २५६ स्टोरेज मॉडेल ७९ हजार १८९ रुपये आणि ५१२ जीबी मॉडेल ९६ हजार ८०७ रुपयांपर्यंत असू शकते.
आयफोन १७ प्रो
हे मॉडेल हलक्या अॅल्युमिनियम बॉडीसह हॉरिझॉन्टल कॅमेरासह लाँच होणार आहे. हे एक नवीन आकर्षक डिझाइन असल्याचे म्हटले जाते. तसंच याचे एंट्री लेव्हल स्टोरेज २५६ जीबीपर्यंत असण्याची शक्यता आहे.
२५६ जीबी स्टोरेजची किंमत १ लाख ५ हजार ६०० एवढी असू शकते, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १ लाख २३ हजार २१५ रूपये असू शकते. १ टीबी मॉडेलची किंमत १ लाख ४० हजार ८३० रुपये असू शकते.
आयफोन १८ प्रो मॅक्स
ज्यांना उत्तम बॅटरी लाइफ हवी आहे, त्यांच्यासाठी हे मॉडेल परफेक्ट आहे. प्रो मॅक्सची बॉडी थोडी जाड असण्याची शक्यता आहे. २५६ जीबी स्टोरेजची किंमत १ लाख १४ हजार ३९२ एवढी असू शकते, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १ लाख ३२ हजार रुपये आणि १ टीबी मॉडेलची किंमत १ लाख ४९ हजार ६१७ रुपये असू शकते.
आयफोन १७ एअर
हे नवीन उत्पादन आहे. प्लस या सीरिजची जागा घेत आयफोन एअर हा फक्त ५.५ मिमी जाडीचा अॅपलचा सर्वात स्लिम स्मार्टफोन असू शकतो. याचा डिस्प्ले ६.६ इंचाचा आणि सिंगल रिअर कॅमेरा असू शकतो. २५६ जीबी स्टोरेजची किंमत ९६ हजार ७८९ रुपये एवढी असू शकते, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १ लाख १४ हजार रुपये आणि १ टीबी मॉडेलची किंमत १ लाख ३२ हजार रुपये असू शकते.
टेकवोवन केसेस (आयफोन कव्हर)
या कार्यक्रमात अॅपल TechWoven केसेसही सादर करणार आहे. आधीच्या FineWoven डिझाइनचे हे सुधारित व्हर्जन असेल.
अॅपल वॉच आणि एअरपॉड्स
या कार्यक्रमात केवळ आयफोन लाँच होणार नाहीत, तर वॉच आणि एअरपॉड्सदेखील लाँच होणार आहेत.
अॅपल वॉच अल्ट्रा ३
अॅपल वॉच मालिकेत अॅपल वॉच अल्ट्रा ३ सादर होणार आहे. यामध्ये जलद चार्जिंग, सॅटेलाइट सपोर्ट, ५ जी कनेक्टिव्हिटी आणि मोठी स्क्रीन यांचा समावेश असेल. अॅपल वॉच सीरिज ११ मध्ये सुधारणा होऊ शकते.
एअरपॉड्स प्रो
बहुप्रतिक्षित एअरपॉड्स प्रो ३ हे एक रिडिझाइन केलेले उत्पादन असू शकते. यामध्ये नॉईज कॅन्सेलेशन आणि अडॅप्टिव्ह ऑडिओ अशी वैशिष्ट्ये असू शकतात