अनेकजणांना फिल्मस्टारसारखं दिसण्याची हौस असते. त्यांच्यासारखं दिसावं, तशी स्टाईल फॉलो करावी यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. एखाद्या कलाकाराची स्टाईल फॉलो करण्यापर्यंत ठिक आहे. पण, आवडत्या फिल्मस्टारसारखं दिसण्यासाठी सर्जरी करणं जरा अतिच होतं नाही का.. असं करताना सर्जरी बिघडून चेहरा विद्रूप होण्याची शक्यता जास्त असते. असाच काहीसा अनुभव आला तो इराणमधल्या एका मुलीला.
VIDEO : ना डुप्लिकेट चावी, ना फोडाफोडीचे फंडे; तरीही काही सेकंदात चोरली आलिशान गाडी
‘या’ पायलट मायलेकी ८० दिवसांत करणार जगभ्रमंती
हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी या मुलीनं ५० हून अधिक सर्जरी केल्या आहेत. इतक्या सर्जरी करून ती काही अँजेलिनासारखी दिसलीच नाही, पण तिचा चेहरा मात्र विद्रुप झाला आहे. ‘डेली मेल’नं दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सहार तबार आहे. ती १९ वर्षांची आहे. अँजेलिना जोलीची ती चाहती आहे, म्हणूनच तिच्यासारखं दिसण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केल्याचं समजत आहे.
पण काहींच्या मते तिचं हे रुप सर्जरीचा परिणाम नसून मेकअपची कमाल असल्याचं म्हटलं जात आहे. आता खरं खोटं माहिती नाही पण, ही १९ वर्षांची सहार चांगलीच चर्चेत आहे.
Video : दीड वर्षांचा चिमुकला आणि वानरसेनेची ‘ही’ दोस्ती तुटायची नाय!