Viral Vadapav Girl : वडापाव विकणारी चंद्रिका दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. सुरुवातीला जरी ती वडपाव विकण्यासाठी चर्चेत आली असली आता मात्र ती वेगवगेळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. वडा पाव गर्ल म्हणून ओळखली जाणारी चंद्रिका दीक्षितला ओळखले जाते. व्हिडीओमध्ये कधी ती ग्राहकांशी उद्धटपणे बोलताना दिसते, कधी ग्राहकांना रांग मोडू नका म्हणून ओरडताना दिसते. कधी व्हिडीओमध्ये स्टॉल हटवण्यास सांगितल्यामुळे रडताना दिसते तर कधी एका महिलेसह भांडताना दिसते. दरम्यान आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षीतला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओबाबत दिल्ली पोलिसांनी खुलासा केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी शनिवारी या व्हिडिओंबाबत प्रतिसाद देत सांगितले की, “वडपाव विकणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली नाही आणि तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.”

हेही वाचा – बापरे! मुंबई विमानतळावर ३३३ रुपयांना विकली जाते पाणीपुरी, व्हायरल फोटो पाहून नेटकरी चक्रावले

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वडा पाव’ गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित दिल्लीच्या बाहेरील मंगोलपुरी भागात फूड स्टॉल चालवत आहे. काही दिवसांपूर्वी, तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात ती तिच्या स्टॉलजवळ मुलाच्या वाढदिवसानिमित्त भंडारा आयोजित करत होती. ज्यामुळे स्थानिकांबरोबर तिचे भांडण झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले क, भंडाऱ्यामुळे तिच्या स्टॉलजवळ मोठा गर्दी झाली होतीज्यामुळे परिसरातील रहदारीला अडथळा निर्माण झाला.

हेही वाचा –Viral Vadapav Girl चंद्रिका दीक्षितला दिल्ली पोलिसांनी केली अटक? व्हायरल व्हिडीओमध्ये केला दावा, जाणून घ्या सविस्तर…

हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा करत आहे की, ” चंद्रिका दीक्षितला अटक करण्यात आली आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. तक्रारीनंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी दीक्षित यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले.”

हेही वाचा – “ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral

“जेव्हा तिच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी होती आणि तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती, त्यावेळी तिला काही काळ ताब्यात घेण्यात आले होते. वडापाव विक्रेत्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आणि तिला अटक करण्यात आली नव्हती,” असे पोलिसांनी सांगितले.