अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी पहिल्यांदाच भारतात आली होती. तिच्याबाबत माध्यमांबरोबरच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. आता ती आपल्या मायदेशी परतली असूनही तिच्याबद्दलच्या चर्चा अद्यापही सुरुच आहेत. तिचे काही मिम्स आणि जोक्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इवांकाच्या एका व्हिडिओचा वापर करुन त्याला एक अतिशय विनोदी असा व्हॉईस ओव्हर देण्यात आला आहे.
Breaking : Exclusive : Paid media will not show you this. Ivanka Trump actually came to India to get her Aadhaar Card done. pic.twitter.com/YabfDudRZE
— pAgaL_P₹oj3ct (@HoeZaay) November 29, 2017
या व्हिडिओमध्ये इवांका आपण आधारकार्ड करुन घेण्यासाठी भारतात आली असल्याचे म्हटले आहे. @ hoezaay या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पेड माध्यमे आपल्याला या गोष्टी दाखवणार नाहीत असेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे आधारच्या अधिकृत ट्विटर हँडलने या व्हिडिओला प्रतिक्रिया देणारे ट्विट केले आहे. यामध्ये इवांका आपले आधारकार्ड तयार करुन घेऊ शकली नाही कारण ती भारतीय नागरिक नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याला अवघ्या काही तासांत ३७०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर जवळपास २ हजार लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. यामध्ये एक परदेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असून त्यांच्याशी ती आधारकार्डबद्दल बोलत असल्याचा व्हॉईस ओव्हर देण्यात आला आहे.
तिच्या स्वागतासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शिखर परिषदेनंतर सरकारकडून तिच्यासाठी खास शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. जगातल्या सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये इव्हांकासाठी साग्रसंगीत बेत आखण्यात आला होता. ताज फलकनुमा पॅलेस या ठिकाणी हा मेजवानी समारंभ पार पडला. पण, इव्हांका ही आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक असल्यानं तिच्यासाठी लज्जतदार पदार्थ तयार करताना विशेष काळजी घेण्यात आली. इवांका डोनाल्ड ट्रम्प यांची सिनियर अॅडवायजर म्हणूनही काम पहाते.