Jai jawan pathak 10 thar video viral: गोकुळाष्टमी देशभर मोठ्या उत्साहात साजरी होते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत दहीहंडीची लगबग असते. मुंबईतील गोंविदा पथकांमध्ये अधिक उंच हंडी कोण लावणार? जास्तीत जास्त हंडी कोण फोडणार याची स्पर्धा रंगते. अशातच मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे १० थर रचून विश्वविक्रम रचला आहे.ठाण्यातील प्रताप सरनाईक यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले. यावेळी कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला. अशातच आता जय जवान गोविंदा पथकानंही १० थर रचले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून १० थर रचले तेव्हा घडलेला थरार कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
गोविंदा पथकांच्या या गर्दीत ‘जय जवान’ पथक हे जगप्रसिद्ध आहे.जोगेश्वरी पूर्वेच्या जय जवान गोविंदा पथकात ५०० हून जास्त गोविंदा आहेत. या मंडळाचा सराव दहीहंडीच्या दोन महिने आधीच सुरू होतो. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं लयबद्धरीत्या कमीत कमी वेळामध्ये थर लावण्याचं प्रात्यक्षिक जय जवान पथकानं जगासमोर ठेवलं आहे. सध्या त्यांनी त्यांच्या १० थर लावण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे हे गोविंदा पथकाचं लक्ष्य असतं. त्याप्रमाणे या पथकातील सर्व गविंदांनी हे १० थर यशस्वीरित्या रचले खरे; पण शेवटी आठव्या थरावरील गोविंदाचा पाय घसरतो आणि अख्खा मनोरा खाली पडल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ठाण्यात प्रथमच नऊ थर रचून विक्रम केला होता. त्यानंतर या पथकाने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर या पथकाने साडे नऊ थर रचून आपलाच विक्रम मोडीत काढला. यंदा हे गाेविंदा पथक आपला विक्रम पुन्हा मोडीत काढण्याच्या तयारीत होते मात्र त्याआधीच जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकानं १० थर लावत विश्व विक्रम केला आहे. त्यानंतर जय जवान गोविंदा पथकानंही १० थर रचले आहेत.