Baba Wearing Solar Powered Helmet With Fan : एका साधू बाबाने उष्णतेला हरवण्यासाठी एक अजब जुगाड काढला आहे. कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून बाबांनी एका अनोख्या हेल्मेटचा शोध लावलाय. आश्चर्याची बातमी आहे… परंतु खरी आहे. या अनोख्या हेल्मेटचं वैशिष्ट्य म्हणजे या हेल्मेटमध्ये उष्णतेत थंडावा मिळावा म्हणून पंखा बसवण्यात आलाय. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पंखा सौरउर्जेवर चालणारा आहे. हे वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल. होय, जो कोणी हे हेल्मेट घालून उन्हात जाईल त्याच्या तोंडून ‘गर्मी मे थंडी का एहसास!’ हे उद्गार नक्कीच येतील. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भगवे वस्त्र परिधान केलेल्या साधू बाबांनी एक अनोखं हेल्मेट घातलेलं दिसत आहे, जे ‘देसी जुगाड’चा वापर करून बनवलं गेलं आहे. या हेल्मेटमध्ये सोलर प्लेटसह पंखा बसवण्यात आला आहे. कोणीही हे हेल्मेट घातलं, तर त्याच्या डोक्यावर आजुबाजूला उष्णता फिरकणार सुद्धा नाही. तुम्ही विचार करत असाल की, बाबांना उष्णतेवर मात करण्यासाठी अशी विचित्र कल्पना का सुचली?तर हे साधू बाबा घरोघरी फुले विकण्याचं काम करतात. एके दिवशी कडक उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली. यामुळे ते आपला माल विकण्यासाठी बाहेर जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जगणे कठीण झाले. कुटुंबावर याचा फार मोठा परिणाम झाला. कारण ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकत नव्हते.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल

ज्यावेळी त्यांची तब्बेत पुन्हा ठणठणीत झाली त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी पुन्हा फुले विकण्यासाठी घराबाहेर जावे लागत होते. पण उष्णतेपासून बचाव देखील करणे गरजेचे होते. नाहीतर पुन्हा त्यांची तब्बेत बिघडली असती. म्हणून त्यांनी या पंखा असलेल्या हेल्मेटचा शोध लावला. हे हल्मेट तयार करण्यासाठी आवश्यक सामानही घेणं त्यांना शक्य नव्हतं. मग काय देसी जुगाड वापरून त्यांनी अनेक लोकांकडून वेगवेगळे साहित्य उधार घेऊन त्यांनी हा अनोखा पोर्टेबल पंखा बनवला. पोर्टेबल फॅन असलेल्या हेल्मेटमुळे उन्हापासून आराम मिळतो, असे त्यांनी सांगितले. सूर्याची किरणे किती तीव्र आहेत यावर पंख्याची तीव्रता अवलंबून असते.

आणखी वाचा : या प्रेमाला कसलीच तोड नाही! आजी-आजोबांच्या जोडप्याचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

हे बाबा दररोज डोक्यावर हा पोर्टेबल पंखा असलेला हेल्मेट घालून लोकांच्या दारात फुलांच्या माळा विकतात आणि कमावलेले पैसे घर चालवण्यासाठी वापरतात. या ७० वर्षीय बाबांचं नाव लल्लुराम असं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरला आहे. कदाचित तुम्ही मोबाईल स्क्रिन स्कोल करत असताना हा व्हिडीओ तुमच्या नजरेसही पडला असेल. तुम्ही हा व्हिडीओ अजून पाहिला नसेल, तर आत्ताच पहा! खरंच, मजा येईल.

आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली

‘जुगाड’ भारतीयांसाठी काही नवीन नाही. जुगाड करण्यात भारतीय प्रसिद्ध का आहे याचं उत्तम उदाहरण देणारा हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा अप्रतिम जुगाड पाहून अनेक यूजर्सनी बाबाजींच्या कल्पनेचं कौतुक केलंय. तर काहींनी हा जुगाड उष्णतेपासून वाचण्यासाठी योग्य असल्याचं सांगितलंय. असा सुंदर जुगाडू तुम्ही कधी पाहिला नसेल.

हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ ddbhaiya नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.