Jackie Shroff Special Recipe: अभिनेता जॅकी श्रॉफ पर्यावरण संवर्धनाच्या प्रेमासाठी ओळखले जातात. पण सध्या हे ज्येष्ठ अभिनेते त्यांच्या कुकिंग स्किल्समुळे सध्या चर्चेत आले आहेत. जॅकी श्रॉफ यांची ”अंडा कडीपत्ता रेसिपी’ रेसिपीनंतर, आता”कांदा भेंडी ड्राय रेसिपी” चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही रेसिपी ट्राय केली आणि त्यांना ती आवडली.

इन्स्टाग्रामवर फूड व्लॉगर्सनी शेअर केलेल्या कोलाज व्हिडिओमध्ये त्यांनी जॅकी श्रॉफच्या सूचनेनुसार त्यांची रेसिपी शेअर केली आहे. क्लिपमध्ये, अभिनेता त्याच्या ‘भिडू’ शैलीमध्ये रेसिपीचा सांगताना दिसत आहेत तर व्लॉगर्सने त्यांची रेसिपीनुसार कांदा भेंडी तयार करून त्याचा आस्वाद घेतला. “दिग्गज जॅकी श्रॉफ ‘कांदा भेंडी'” या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते,पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओची सुरुवात जॅकी श्रॉफने कांदा भिंडीची ही कोरडी रेसिपी आहे हे सांगून होते. त्यांनी स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ”, ”अब कांदे को अपने को काटने का है चौकंदी. (आता आपण कांद्याचे बारके चौकोनी तुकडे करावे लागतील.)” नंतर बॅक्टेरियाचा हल्ला टाळण्यासाठी चिरलेला कांदा पाण्यात भिजवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे भेंडीचे चौकोनी तुकडे करायला सांगितले. यानंतर, तो कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि भेंडी घालण्यास सांगताच. जॅकी श्रॉफ आवर्जून सांगतात की, ”हे कढईत टाकल्यानंतर आजिबात हलवू नका. त्याने सांगितले की, ”अशा प्रकारे ही रेसिपी कोरडी राहील. ताट झाकून व्यवस्थित शिजू द्यायला असे ते सांगतात. तुम्ही भाकरीसोबत या रेसिपीचा उत्तम आनंद घेऊ शकता असे सांगून त्यांनी व्हिडिओ पूर्ण केला.

हेही वाचा – मित्राशेजारी झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाची धडपड, व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरनेट या अभिनेत्याच्या रेसिपीचे कौतुक करत आहे. “जग्गु दादा मास्टर शेफ” अशी एक कमेंट्स लिहिली आहे. जॅकी श्रॉफने त्याच्या “आवडत्या अंडा कडीपत्ता रेसिपी” साठी चर्चेत आल्यानंतर काही महिन्यांनी ही क्लिप झाली आहे.