जगभरातील शक्तिशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतले जाते. त्यांची ही लोकप्रियता दिवसागणिक वाढतेय. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यात एक काश्मिरी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउट पुतळ्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ घंटाघर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय फेरान डे २०२३ कार्यक्रमादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्या व्यक्तीने पी. एम .मोदींच्या कटआउटला आधी पोशाख घातला. त्यानंतर प्रेमाने मिठी मारली आणि दोनदा चुंबन घेतले आणि मग त्याने पुन्हा मोदींच्या कटआउटला मिठी मारली. आता याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Suspect arrested from Yerawada area in view of Prime Minister visit pune print news
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शेखइमरानऑफिशियल नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओला लोक खूप पसंत करीत आहेत. ही पोस्ट शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, ” ‘फेरान डे’च्या निमित्ताने एका काश्मिरी व्यक्तीने

श्रीनगरमधील क्लॉक टॉवर समोरील पी. एम. मोदींच्या पुतळ्याचे चुंबन घेतले.” हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक युजर्सनी शेअर केला आहे. त्याच वेळी लोक आता आपल्या प्रतिक्रियाही उत्स्फूर्तपणे देत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अनेक लोकांना हे आवडले नसणार.” दुसर्‍या युजरने लिहिले, “हे प्रेमाचे दुकान आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले, “देशातील प्रामाणिक सरकार.”