आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा आजकाल नेहमी चर्चेत असलेला विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात AI हा सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड बनला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शिक्षणासह आपल्या जीवनातील विविध गोष्टींमध्ये प्रवेश केला आहे. AI तंत्रज्ञान शिकणे हे खूप मजेदार आणि सोपे केले आहे. आता याच तंत्रज्ञानाच्या मदतीने केरळच्या शाळेने कोणीही कल्पना केली नसेल अशी गोष्ट केली आहे. केरळच्या एका शाळे आता AI शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. विश्वास बसत नसला तर हे सत्य आहे. या AI शिक्षिकेचे नाव आयरिस असे आहे.

आयरिस ही एक ह्युमनॉइड रोबो आहे जिचे बाह्यरंग, रुप आणि स्वरुप मानवी पण ती एक एआय रोबोट आहे. या ह्युमनॉइड रोबोचे अनावरण गेल्या महिन्यात तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात मेकरलॅब्स एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

मेकरलॅब्सच्या मते, “आयरिसची निर्मिती अटल टिंकरिंग लॅब (Atal Tinkering Lab) चा भाग म्हणून करण्यात आली होती. २०२१ च्या NITI आयोगाचा हा प्रकल्प शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त उपक्रमांना चालना देण्यासाठी सुरू केला होता.

इन्स्टाग्रामवर makerlabs_official पेजवर आयरिसचा व्हिडिओ शेअर करताना, मेकरलॅब्सने लिहिले, “आयआरआयएससह, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिकण्याचा अनुभव घेण्यासाठी एआयच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची तयारी केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा आणि प्राधान्यांशी जुळवून घेऊन, आयरिस आकर्षक आणि प्रभावी धडे देण्यास सक्षम आहे.”

हेही वाचा – एलॉन मस्क नव्हे आता ही व्यक्ती आहे जगात सर्वात श्रीमंत; टेस्ला सीईओची दुसऱ्या स्थानावर का झाली घसरण?

व्हिडीओमध्ये दिसते की, आयरिस या ह्युमनॉइड रोबोला महिला शिक्षिकेप्रमाणेच साडी नेसल्याचे दिसत आहे. आयरीस तीन भाषा बोलू शकते आणि कठीण प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकते. व्हॉइस असिस्टंट, इंटरएक्टिव्ह लर्निंग, मॅनिप्युलेशन क्षमता आणि गतिशीलता अशी काही वैशिष्ट्ये देखील या ह्युमनॉइड रोबामध्ये आहेत.

हेही वाचा – Dry Ice म्हणजे काय? माऊथ फ्रेशनर समजून ‘ड्राय आईस’ खाल्याने ५ जणांना झाली रक्ताची उलटी

Makerlabs ने दिलेल्या माहितीनुसार, आयरिस ही एक शैक्षणिक रचना आणि DIY शिक्षण वातावरणात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले नाविन्यपूर्ण व्हाईस असिस्टंट(voice assistan) रोबोट आहे”. आयरिसची निर्मिती रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केली आहे. या ह्युमोनाइड रोबोटमध्ये परस्परसंवादाची क्षमता आहे आणि बहुमुखी शिक्षणाचे साधन म्हणून ते काम करू शकतो. एक समर्पित इंटेल प्रोसेसर आणि मॅन्युव्हरिंग टास्कसाठी कॉप्रोसेसरसह सुसज्ज असलेला हा रोबोट अंखड कामगिरी आणि प्रतिसाद देतो. त्याच्या अँड्रॉइड ॲप इंटरफेसच्या मदतीने वापरकर्ते आपल्या गरजेनुसार शिकण्याचा अनुभव घेण्यासाठी रोबोट सहजपणे नियंत्रित करू शकतात आणि त्याच्याशी संवाद साधू शकतात,” असे त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.