Jeff Bezos world’s richest person: ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकत ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे. मस्क यांची एकूण संपत्ती आता $१९७.७ बिलियन इतकी आहे तर जेफ बेझोसची संपत्ती $२००.० बिलियन आहे.

एलॉन मस्क यांची दुसऱ्या स्थानावर का झाली घसरण?

अहवालानुसार, टेस्ला सीईओ यांनी सुमारे $३१ बिलियन गमावले आहेत तर ॲमेझॉनच्या संस्थापकाने मागील वर्षात $२३ बिलियन कमावले आहेत. ४ मार्च रोजी टेस्लाचा शेअर ७.२ टक्क्यांच्या घसरल्यानंतर मस्क यांनी आपले क्रमांक एकचे स्थान गमावले. टेस्लाच्या सीईओ मस्क यांना डेलावेअर कोर्टाच्या निर्णयानंतर आणखी एका मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. कारण टेस्लाच्या संचालक मंडळाने दिलेल्या महत्त्वाच्या भरपाई पॅकेजसाठी इलॉन मस्क पात्र नाही, जे अपेक्षित $५५ बिलियन पेक्षा जास्त आहे, असे न्यायधिशांनी सांगितले.

dubai flood effect
पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
Delhi has the highest number of land transactions in the country
देशात जमिनीचे सर्वाधिक व्यवहार दिल्लीत
candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

हेही वाचा – Dry Ice म्हणजे काय? माऊथ फ्रेशनर समजून ‘ड्राय आईस’ खाल्याने ५ जणांना झाली रक्ताची उलटी

एलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये किती आहे फरक?

दोन अब्जाधीशांमधील निव्वळ संपत्तीचे अंतर, जे एकेकाळी $ १४२ बिलियन होते, ते गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. Amazon आणि Tesla हे दोन्ही “मॅग्निफिसेंट सेव्हन” स्टॉकचा भाग आहेत जे अमेरिकन स्टॉक मार्केट चालवतात. ॲमेझॉनने २०२२ च्या उत्तरार्धापासून त्याचे शेअर्स दुप्पट झाल्याचे पाहिले आहेत, तर टेस्लाच्या स्टॉकची किंमत २०२१ मधील किंमतीच्या तुलनेत अंदाजे ५० टक्क्यांनी घसरली आहे.

जेफ बेझोस यांनी अशी मारली बाजी

अलीकडच्या काळात $८.५ बिलियन किमतीचे शेअर्स विकूनही बेझोस त्यांच्या कंपनीतील सर्वात मोठे भागधारक बनले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांचे पद सोडल्यानंतर २०१७ मध्ये ॲमेझॉनचे सीईओ प्रथमच ब्लूमबर्ग यादीत अव्वल स्थानावर होते.

यापूर्वी, जानेवारी २०२१ मध्ये, टेस्लाच्या सीईओने बेझोसला $१९५ बिलियनडॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन साठी यादीत मागे टाकले होते.

हेही वाचा – आनंद महिंद्रा यांच्या पत्नीला पाहिलंत का? अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जोडप्याने वेधलं लक्ष, अनुराधा करतात ‘हे’ काम

अदानी आणि अंबानी यांनीही मिळवले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि अदानी समूहाचे संस्थापक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी अनुक्रमे ११व्या आणि १२व्या स्थानावर $ ११५ बिलियन आणि $१०४ बिलियन संपत्ती मिळवली आहे.