आपल्या येथे टॅलेंटची कमी नाही, पण योग्य ती संधी आणि व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अशा लोकांना कधीच प्रसिद्धी अनुभवता येत नाही. पण सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्याप्ती वाढल्याने सामान्यांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तेव्हा एखाद्या व्यक्तीचे कलागुण आवडले की त्या व्यक्तीला सोशल मीडियावर अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं जातं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या कलागुणांनी कोट्यवधी लोकांची मनं जिंकून घेतली आणि सोशल मीडियासारख्या मोठ्या व्यासपीठामुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. सध्या असाच एक ‘लिटिल मास्टर’ यूट्युबवरचा स्टार ठरला आहे.
Viral Video : आलिया, सनी लिओनचा डान्स तिच्यासमोर पडला फिका
एका खेडेगावात राहणाऱ्या मुलानं बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला आहे. या मुलाचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. त्याच नाव समजू शकलं नाही. पण, स्वप्नील चव्हाण नावाच्या युट्युब अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत युट्युबवर १६ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या ‘लिटिल मास्टर’नं आपल्या डान्सच्या अफलातून शैलीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तेव्हा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नासाठी एक लाईक तर बनतोच ना!