कॅनेडियन रॅप गायक ड्रेकच्या ‘इन माय फिलिंग्ज’ या व्हिडिओतील ‘किकी डु यू लव मी’ या गाण्यानं तरूणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. आणि यातूनच सुरू झालेलं किकी चॅलेंज दिवसेंदिवस पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारचा थिल्लरपणा न करण्याचा आवाहन पोलीस करत आहेत. मात्र अनेकांना यातील गांभीर्य कळत नाही. हेच चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अमेरिकेतील १८ वर्षीय तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे.
अॅना वॉर्डेन असं या तरुणीचं नाव असून ती डान्सर आहे. सोशल मीडियावर धुकाकूळ घालणारा हा नवा डान्स ट्रेण्ड तिलाही करून पाहायला होता. मात्र ती यात अयशस्वी झाली. चालत्या गाडीतून खाली उतरून डान्स करण्याच्या नादात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या अॅना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे आणि तिची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
किकी चॅलेंजचं खूळ स्पेन, युएस. मलेशिया यांसारख्या देशात वेगानं पसरत आहे. आश्चर्य म्हणजे ड्रेकच्या मूळ गाण्यात कुठेही स्टंट नाही. किकी चॅलेंजमुळे गंभीररित्या जखमी झालेली पहिलीच घटना आहे मात्र जगभरात हे चॅलेंज करताना किरकोळ जखमी झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अॅनासोबत जे घडलं ते इतर कोणत्याही तरूण तरुणांच्या बाबतीत घडू नये त्यामुळे हे चॅलेंज न करण्याचं आवाहन अनेकजण करत आहेत.