‘आईचा दुर्धर आजारानं काहीदिवसांपूर्वीच मृत्यू झाला, आता वडील माझा सांभाळ करतात. पण, आईसारखी माझी तयारी करायला मात्र बाबांना जमत नाही. मलाही केसांची वेणी बांधता येत नाही आणि बाबांनाही.’ ११ वर्षांच्या इसाबेलाचे विस्कटलेले आणि खराब केस पाहून स्कूल बसचालकानं तिला प्रश्न विचारला. तिनं डोळ्यात पाणी आणून दिलेलं उत्तर ऐकून तिची बस चालक ट्रॅसीच्या काळजाचं पाणी झालं. अन् तिनं मनाशी तिला मदत करण्याचं पक्क केलं. आता नियमीत बस इसाबेलाच्या दाराशी आली की ती आधी लहानग्या इसाचे केस छान विंचरते, कधी ती वेणी बांधते तर कधी तिची छानशी केशरचना करून देते आणि मगच तिला शाळेत सोडते.
वाचा : गुगल असिस्टंटच्या आवाजावर भारतीय फिदा, लग्नासाठी ४.५ लाखांहून अधिक प्रस्ताव
आईच्या निधनानंतर इसाबेल नेहमीच विस्कटलेले केस घेऊन शाळेत जाईची. तिचे न बांधलेले केस पाहून सगळेच तिला खूप चिडवायचे पण केस न बांधता शाळेत येण्याचं खरं कारण मात्र तिनं कोणालाच सांगितलं नव्हतं. एकेदिवशी मात्र स्कूलबस चालकाला तिनं खरं कारण सांगितलं. तेव्हापासून आतापर्यंत न चुकता ट्रॅसीच बसमध्ये तिचे केस विंचरते. बाबा शाळेची सर्व तयारी करून देतात पण ,त्यांना केस मात्र बांधात येत नाही. असं ईसा म्हणाली होती. तिचे ते दु:ख ऐकून ट्रसी नेहमची तिचे केस बांधून देऊ लागली.
वाचा : उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..
ट्रसी माझे केस बांधते तेव्हा असं वाटतं की माझी आईच माझ्या जवळ आहे, असं लहानगी ईसा म्हणते. ईसाचे केस बांधायला वडिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मुलांसारखे तिचे केस लहान ठेवले होते पण नंतर मात्र इतर मुलींचे लांब केस पाहून तिनं हट्टानं आपले केस वाढवून घेतले होते.