पाकिस्तानमध्ये पालक आपल्या घरातील मुली आणि महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. एएनआयने डेली टाईम्सच्या वृत्ताचा आधार घेत हे वृत्त दिलं आहे. याबाबत सोशल मीडियावरही अनेक दावे केले जात आहेत. लेखक हॅरिस सुल्तान यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारांमुळे असे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे.

हॅरिस सुल्तान यांनी आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानमध्ये महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार होत असल्याचा दावा करताना म्हटलं, “पाकिस्तानने लैंगिक नैराश्य आलेल्या समाजाला जन्म दिला आहे जेथे महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरींवर कुलुप लावावं लागत आहे. तुम्ही जेव्हा बुर्ख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा हाच बलात्कार कबरीपर्यंत येऊन पोहचतो.”

bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

२०११ मध्ये पाकिस्तानमधील एका कबरस्तानमध्ये कबरींचं संरक्षण करणाऱ्याने ४८ महिला मृतदेहांवर बलात्कार केल्याचं कबुल केलं होतं, असंही एएनआयने म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार, पाकिस्तानमध्ये ४० टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी एकदा तरी कोणत्या तरी स्वरुपातील हिंसेला सामोरं जावं लागतं, असंही एएनआयने नमूद केलं आहे.

पाकिस्तानमध्ये महिलांच्या मृतदेहांवर बलात्काराच्या वृत्तावर आक्षेप

दरम्यान, फॅक्ट चेकिंग वेबसाईट अल्ट न्यूजने एएनआयने पाकिस्तानमधील महिलांच्या मृतदेहांवर बलात्काराच्या वृत्तासाठी वापरलेल्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. एएनआयने कबरींना कुलुप लावण्यासाठी जो फोटो वापरला तो पाकिस्तानमधील नसून हैदराबादमधील असल्याचं एएनआयने म्हटलं आहे. याबाबत अल्ट न्यूजने हैदराबादमधील रहिवाशांच्या मदतीने कुलुप लावलेल्या कबरीचा व्हायरल फोटो आणि हैदराबादमधील कबरीचा वास्तवातील फोटो असा तुलनात्मक अभ्यासही केला. यातून व्हायरल होत असलेला कबरीचा फोटो पाकिस्तानमधील नसून हैदराबादमधील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : चॅटरूम ते पाकिस्तान: प्रेयसी फातिमाला भेटायला पुण्यातील विद्यार्थी गेला थेट कराचीत, मात्र होता ‘आयएसआय’चा कट

कबरीवर लोखंडी जाळी आणि कुलुप का?

हैदराबादमधील ज्या कबरस्तानमध्ये ही कबर आहे तेथे जागेअभावी अनेकदा कबरस्तान समितीच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे जुन्या कबरींवरच नव्याने मृतदेहाचा दफनविधी केला जातो. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी एका कबरीवर नातेवाईकांनी सुरक्षा म्हणून लोखंडी जाळी लावली होती. त्याचा बलात्काराशी कोणताही संबंध आढळला नाही.