Kolhapur student video against pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागातड मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या एका विद्यार्थ्याचं भाषण व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या व्हिडीओतून या चिमुकल्याचं देशप्रेम दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कोल्हापुरातील चंदगडमधील दूंडगे गावचा आहे. कुमार विद्यामंदीर दूंडगे या शाळेतील हा विद्यार्थी असून त्याच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या भाषणात या विद्यार्थ्यानं संपूर्ण त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो, “हे पाकिस्तानवाले काय करतात दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि आम्हाला गोळ्या घालतात..लागली तर गोळी मरणार नाही..आणि लागली तर लागुदेत देशासाठी मरणार की.. दुसऱ्याच्या जीवावर जगत्यात अन् आमच्यावर गोळ्या झाडताय व्हय..लय आली मोठी. आणि जाता जाता एवढंच म्हणतो की, डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखलं वादळ…देव आमचा छत्रपती एकटा भिडतो वाघ..छत्रपती शिवाजी महाराज की जय…”

लहान मुलांमध्ये देशप्रेम जागवणे म्हणजे त्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करणे. आपण आज जे स्वातंत्र्य भोगतो आहे त्यासाठी या देशाच्या कित्येक पुत्रांनी आपले प्राण पणाला लावले आहे हे ना आपण कधी विसरले पाहिजे, ना कधी आपल्या येणाऱ्या पिढीला विसरू दिले पाहिजे. ज्या तरुण पिढीला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे मोल असते त्या पिढीच्या काळात देश एका वेगळ्या उंचीवर जातो.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Unique Belgaum (@uniquebelgaum)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ uniquebelgaum नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून या चिमुकल्यातं आता सर्वच कौतुक करत आहेत.