Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल | Loksatta

Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल

माळरानात चरायला गेलेल्या एका हरणावर कोमोडो ड्रॅगनने हल्ला केला.

Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल
कोमोडो ड्रॅगनने हरणाची शिकार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (image-social media)

जंगलाच्या दुनियेबाबत असं म्हटलं जातं, ज्याची काठी त्याची म्हैस…म्हणजेच ज्याच्याकडे ताकद असते तोच जीवंत राहतो. या रानावनात खुद्द शिकाऱ्याचीच कधी शिकार होईल, याचा नेम नाही. वाघ, सिंह यांसारखे हिंसक प्राणी समोर आल्यावर हरण, बकरी, म्हैस यांसारख्या प्राण्यांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागतो. जंगलात या प्राण्यांसारखा एक भला मोठा प्राणी आहे, जो हरणासारख्या प्राण्याला गिळू शकतो. हो ते सत्य आहे. कारण त्या प्राण्याच नावं आहे कोमोडो ड्रॅगन..

हा हिंस्र प्राणी अजगराप्रमाणेच इतर प्राण्यांना गिळतो. माळरानात चरायला गेलेल्या एका हरणावर कोमोडो ड्रॅगनने हल्ला करुन त्याला गिळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही क्षणातच हरणाच्या जीवनाचं होत्याचं नव्हतं करणाऱ्या या कोमोडो ड्रॅगनचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. शिकारीच्या शोधात निघालेल्या कोमोडो ड्रॅगनची नजर एका हरणावर पडते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कोमोडो ड्रॅगनने हरणाला पकडण्यासाठी धाव घेतली. या कोमोडो ड्रॅगन प्राण्याने वेगानं धावत येऊन हरणाच्या डोक्यावर हल्ला चढवला. हरणाची पूर्णपणे शिकार केल्यानंतर काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगन प्राण्याने त्या हरणाला गिळलं.

नक्की वाचा – करायला गेला एक अन् झालं भलतंच! रस्त्यावरून जाणाऱ्या मगरीचा व्हिडीओ काढायला गेला, पठ्ठ्याला असं पळवलं…; पाहा Viral Video

इथे पाहा व्हिडीओ

एवढ्या मोठ्या हरणाला गिळल्यानंतर कोमोडो ड्रॅगन त्याची मान पुन्हा एकदा हवेत झटकून पहिल्यासारख्या अवतारात पुन्हा येते, हे पाहून धक्काच बसेल. म्हणजेच जणू काही तो लगेच नवीन शिकार शोधायला जाणार आहे, असंच वाटतं. व्हिडीओमधील हा शेवटचा क्षण अंगावर काटा आणणारा आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. Wildlifeanimall नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 21:16 IST
Next Story
Viral Video: पोलिसांचा अनोखा अवतार आला समोर, ‘दंड नको, हेल्मेट घाला’ म्हणत महिलेसमोर जोडले हात