मुंबई : वाहनतळावर उभी केलेली बस बाहेर काढताना पुतण्याने कोणतीही तपासणी न केल्यामुळे बस खाली चिरडून काकाचा मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी येथे घडली. बसखाली काका झोपलेले असल्याची खातरजमा न करता त्यांच्या अंगावर त्याने बस चढवली. यात गंभीर जखमी झालेल्या काकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गोकुळदास नवतुरे (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
हेही वाचा… अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
भरत नवतुरे यांचा या घटनेत मृत्यू झाला. भरत आणि त्यांचा पुतण्या गोकुळदास हे एकत्रच वाशिंद येथे राहत होते. शिवाय दोघेही काळाचौकी येथील मोहम्मद हातिम दुधवाला यांच्या मोहम्मद टुर्स अँन्ड ट्रँव्हल्स या ट्रान्सपोर्टमध्ये काम करत होते. दोघेही स्कूलबस चालवतात. शिवडी येथील पालिकेच्या वाहनतळावर कंपनीच्या गाड्या पार्क केलेल्या होत्या. १५ तारखेच्या सकाळी गोकुळदास बस सुरू करून पुढे नेत असताना मागच्या चाकाखाली भरत आले. हे कळताच त्याने बस मागे घेऊन भरत यांना बाजूला काढले. मात्र यात भरत यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ परळ येतील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना भरत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी भरत यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गोकुळदास याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.