Baby Names: प्रत्येक आईला वाटत असते तिच्या मुलामध्ये श्री कृष्णाचे गुण असावे. आपल्या बाळाचे बालपण हे श्री कृष्णासारखे खट्याळ अन् मजा मस्ती करणारे असावे. तुम्हालाही तुमच्या मुलांवर श्री कृष्णांची कृपा असावी असे वाटत असेल तर श्री कृष्णांशी संबधित गोंडस नावावरून त्याचे नाव ठेवू शकता. गुगल ट्रेंडमध्ये सध्या krishna janmashtami हा किवर्ड चर्चेत आहे. चला कृष्णासंबधीत सुंदर, वेगळी आणि ट्रेडिंग नावे जाणून घेऊ या.

मुलांसाठी श्री कृष्णासंबधीत सुंदर नावे (Lord Krishna Inspired Baby Boy Names)

बाळगोपाळ – बाळकृष्णाशी संबधित हे सुंदर नाव तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता.
मोहन – या नावाचा अर्थ जो मोहून टाकतो असा आहे. श्री कृष्णाचे सुंदर रूप मोहून टाकावे असे होते त्यामुळे त्याला मोहन असे म्हणत. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव मोहन ठेवू शकता.
कन्हय्या – भगवान कृष्णाचे हे नाव आहे जे तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाचे हे नाव ठेवू शकता.
कृष्णांश – श्रीकृष्णाच अंश असा या नावाचा अर्थ होतो. हे नाव कृष्णाशी संबधीत आहे.
गोपाल – गाय पाळणारा म्हणजेच गोपाळ. हे श्री कृष्णाचे नाव सुंदर नाव आहे.
कृष्ण – हे भगवान विष्णुच्या अवाताराचे नाव आहे. तुमच्या बाळाला हे सुंदर नाव ठेवू शकता.
गोविंद – जगाचा पालनकर्ता असलेल्या कृष्णाचे हे नाव असून ऐकल्यानंतर नेहमीच नवे आणि वेगळे नाव वाटते.
माधव – देवी लक्ष्मीचा स्वामी जो श्री कृष्ण आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव माधव ठेवू शकता.
श्याम – सावळ्या रंगाच्या सुंदर श्री कृ्ष्णाला श्याम देखील म्हणत असे. तुमच्या बाळाला तुम्ही हे नाव ठेवू शकता.
सांवले रंग के, सुंदर वाले कृष्ण को श्याम भी कहते हैं.
रमण – भक्तांचे हृदय जिंकणारा असा या नावाचा अर्थ होतो. श्री कृष्णाचे हे नाव आहे.

Lord Krishna
Lord Krishna (Freepik)

कृष्ण संबधीत इतर नावे ( Baby Boy Names On Laddu Gopal)

मुरलीधर – श्री कृष्णाला बासूरी अत्यंत प्रिय आहे आणि ते उत्तम बासूरी वाजवत त्यामुळे त्यांना मुरलीधर असे म्हणत.
केशव – ज्यांचे सुंदर केस आहे असा. श्री कृष्णाला केशव देखील म्हणत असे त्यामुळे तुमच्या बाळाचे नाव तुम्ही केशव ठेवू शकता.
वासुदेव – वसूदेवाचे पुत्र असल्याने श्रीकृष्णाला वासूदेव म्हणत असे. हे देखील एक सुंदर नाव आहे.
राधेश्याम – राधा आणि श्याम यांच्या संगम रुपाला राधेश्याम म्हटले जाते. हे सर्वात सुंदर नाव आहे.
गिरिधर – गोवर्धन पर्वत उचलणारा म्हणजे श्री कृष्णाचे हे सुंदर नाव आहे.
मुकुंद – या नावाचा अर्थ मुक्ती देणारा असा आहे. श्री कृष्णाला मुकूंद असे म्हटले जाते
चक्रधर – सुदर्शन चक्र धारण करणारा म्हणजेच श्री कृष्णाचे सुंदर नाव आहे.
अच्युत – कधीही पराभूत न होणारा असा म्हणजेच श्री कृष्ण.
श्रीधर – देवी लक्ष्मीचा स्वामी
राधाकांत -राधेचा प्रियकर
राधेश- राधेचा प्रियकर
चंद्रेश – चंद्रासारखा तेजस्वी

krishna janmashtami (Google Trends)

१५ ऑगस्टसला कृष्णजन्माष्टमी असल्याने गुगल ट्रेंडमध्ये krishna janmashtami हा किवर्ड चर्चेत आहे.