scorecardresearch

Premium

Video: मजुराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले “हा तर मायकल जॅक्सन”

सोशल मीडिया हे माध्यम इतकं वेगवान झालं आहे की, एखादी व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येते.

Labour_Dance
Video: मजुराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले "हा तर मायकल जॅक्सन" (Photo- Viral Video Grab)

सोशल मीडिया हे माध्यम इतकं वेगवान झालं आहे की, एखादी व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येते. लोकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना सोशल मीडियामुळे नवा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. काही इतके जबरदस्त असतात की, असे व्हिडीओ वारंवार पाहण्याचा मोह आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये बांधकामाच्या ठिकाणी असलेला एक मजूर जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोकांची पसंती मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की काही लोक बांधकामाच्या ठिकाणी बसले आहेत. तिथे एक व्यक्ती अचानक उठून नाचू लागते. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो कुठून हा डान्स शिकला असेल असे वाटत नाही. त्याचा अप्रतिम डान्स पाहून तिथे बसलेले लोकही टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्यक्तीची तुलना मायकल जॅक्सनशी करत आहेत.

Viral Video Of Manchurian Making Upsets Internet
मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार
An unknown person sets fire to the skirt of a woman standing outside a shop
व्यक्तीने मस्करीच्या नादात फोनवर बोलणाऱ्या महिलेच्या स्कर्टला लावली आग… Video पाहून व्हाल चकित!
constable leave application goes viral
“लग्नाचं वय निघून जात आहे, मुली मिळेनात…” पोलीस हवालदाराने लिहिलेला रजेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल
viral news woman sends money to wrong number share how she got money back tweet goes viral on social media
महिलेने चुकून भलत्याच नंबरवर ट्रान्स्फर केले पैसे; मग पुढे असे काही झाले की, तुम्हालाही हसू रोखणे होईल अवघड; पाहा photo

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी शेअर केला आहे. व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Labour dance steps viral on social media rmt

First published on: 27-01-2022 at 17:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×