Lalbaug crowd video viral: गणपती बाप्पा मोरया…, गणेश गणेश मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपती आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत. खरं तर गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून १६ दिवस बाकी आहेत. पण, मुंबईत काही ठिकाणी आताच गणेशमूर्त्यांचं आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीचे ३ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात भक्तांनी स्वागत केलं. हजारोंच्या संख्येने भक्त, तरुण मंडळी यावेळी एकत्र आली होती. मात्र, या गर्दीच्या उत्साहामागचं भीषण वास्तव तुम्ही पाहिलं तर पुन्हा कोणत्या आगमनाला जाण्याआधी शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.

भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं…यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अशातच गणेशोत्सव जवळ आला असताना सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. रविवारच्या सुट्टीची संधी साधत मुंबईत आज गणपतीचे स्वागत करण्यात येणार आहे. अशातच लालबाग परळ म्हणजे, भक्तांसाठी पंढरीच..याच नगरीत लाखोंच्या संख्येने लोक आगमनालाही गर्दी करतात.

काळाचौकीमधील महागणपतीचं हे थरारक आगमन पाहून खरंच तुम्हीसुद्धा अवाक् व्हाल. दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी सकाळपासून गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. तरुण-तरुणींचे ग्रुप्स चिंचपोकळी, करी रोड स्थानकांवर मोठमोठ्या आवाजात किंचाळत-ओरडत मिरवणुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती आणली जातेय, त्या मार्गावर प्रचंड गर्दी आहे. लोकांना साधं उभं राहायलाही जागा नाहीये. अशातच चेंगरा-चेंगरीची शक्यता असताना तिथे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणी गर्दीमध्ये चेंगरल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशात गर्दीमुळे काहीच करता येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशातच आज लालबाग परळमध्ये तीन मोठ्या गणपतींचं आगमन आहे, विचार करा आज किती गर्दी होईल. त्यामुळे लालबागला गणपती आगमन बघायला जाताना हा व्हिडीओ नक्की पाहा.

बाप्पाच्या आगमनाला जाण्याआधी हे पाहा

पाहा व्हिडीओ

rakesh._.dhanu नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.