Viral video: “सचिन वनंजे अमर रहे!”, “भारत माता की जय!” अशा घोषणा देत देगलूरमधील शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे ६ मे रोजी एका अपघातात शहीद झाले होते. अवघ्या ८ महिन्यांचा चिमुकल्या जीवाला वडिलांना पहिल्यांदा भेटण्याआधीच शेवटची भेट घ्यावी लागली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले जवान सचिन वनंजे यांचे पार्थिव गावात दाखल होताच, एकच आक्रोश झाला. त्यांच्या आई-वडिलांनी, पत्नीने आणि नातेवाईकांनी टाहो फोडताच उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ‘अमर रहे, अमर रहे, सचिन वनंजे अमर रहे ’ या घोषणांनी आसमंत दुमदुमला. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होताच शिवाय पितृछत्र हरपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाकडे पाहताना उपस्थितांना गहिवरून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीने आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला. सचिन यांना अखेरचा निरोप देताना पत्नी, भाऊ आणि आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते. हे पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू आले होते.

शहीद जवान मागे ठेवून गेले कुटुंब

सचिन वनंजे यांनी २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता. त्यांची पहिली नियुक्ती सियाचीनमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी जालंधर (पंजाब) आणि सध्या श्रीनगर येथे सेवा बजावली होती. मार्च महिन्यात ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिलमध्ये पुन्हा ड्युटीवर हजर झाले. त्यांचे लग्न २०२२ मध्ये झाले असून त्यांना फक्त आठ महिन्यांची मुलगी आहे.

पाहा व्हिडीओ

शहीद जवानाच्या कुटुंबाचे आयुष्य अत्यंत कठीण आणि दुःखद असते. त्यांच्यावर अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच, त्यांना प्रशासकीय कामांमध्येही अनेक अडचणी येतात. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही ते धीराने आणि संयमाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.शहीद जवान कुटुंबाचे प्रमुख असल्याने, त्यांच्या जाण्याचे दुःख आणि आर्थिक नुकसान यांच्यावर मोठे परिणाम करतात. कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात. शहीद जवानाच्या कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचा मोठा मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागतो. या दुःखातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी खूप कठीण असते.