leopard hunting deer video: जंगलात शिकारीसाठी टपलेल्या वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांची सावली जरी दिसली, तर हरणासारखे प्राणी वाऱ्याच्या वेगानं धूम ठोकतात. माळरानात चरायला आलेल्या हरणांच्या कळपानेही एका बिबट्याला पाहून गिअर बदलला आणि पळ काढला. पण बिबट्याने शिकार करण्याचा ठाम निर्धार केल्यानं एका हरणाची शिकार झाली. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरणाच्या कळपात एकाची बिबट्याने मोठ्या चपळाईने शिकार केली. बिबट्याने रचलेल्या सापळ्यात हरण फसला आणि जीव गमावून बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरणाच्या कळपातील एकावर बिबट्याने मोठी झेप टाकली अन्….

एका माळरानात तलावाच्या शेजारी हरणांचा कळप उभा असतो. त्याचवेळी वाऱ्याच्या वेगानं समोरून येणाऱ्या बिबट्याचा अंदाज हरणाच्या कळपाला येते आणि काही क्षणातच हरण धूम ठोकतात. पण बिबट्याची नजर एका हरणावर आधीपासूनच टपलेली असते आणि मोक्याच्या क्षणी हरणावर झडप घेऊन बिबट्या त्याची शिकार करतो. ही सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली आहे. चालत्या फिरत्या हरणाला काही सेकंदातच बिबट्या जमिनीवर आडवा करतो आणि त्याची शिकार करतो. हा थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण चपळ बिबट्या काही सेकंदातच हरणाचं जीवन संपवून टाकल्याचा थरार या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video: बापरे! चक्क नागासमोर ‘माकड’चाळे, शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा अन्…; पाहा Viral व्हिडीओ

इथे पाहा व्हिडीओ

जंगलात मुक्त संचार करणारे हरण तहानेनं व्याकुळ झाल्यावर तलावाच्या किंवा नदीच्या किनाऱ्यावर येतात. पण पाण्याच्या ठिकाणीही मगर जबडा उघडूनच बसलेली असते आणि हरण दिसताच त्याच्यावर हल्ला करते. माळरानातही चरायला गेल्यावर हरणाला वाघाची,सिंहाची आणि बिबट्याची भीती सतावत असते. त्यामुळे हरणांचे हिंस्र प्राणी नेहमीच शिकार करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कधी कधी हरणही मोठ्या चालाखीने बिबट्याला गुंगारा देऊन पसार होतात. हरणासारखा शांत प्राणी जंगलात बिबट्याची नेहमीच शिकार होत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attack flock of deer leopard hunting deer video viral on instagram wild animals latest update nss
First published on: 26-12-2022 at 21:14 IST