scorecardresearch

बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर केला हल्ला; व्हायरल CCTV फुटेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडिओमध्ये बिबट्या एका उंच भिंतीवरुन थेट घराच्या आत उडी मारतो आणि व्हरांड्यातील कुत्र्यावर जोराचा हल्ला करतो

Viral leopard video
अनेकदा वन्य प्राणी शिकारीच्या शोधात मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. (Photo : Instagram)

अनेकदा वन्य प्राणी शिकारीच्या शोधात मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. तर अशा प्राण्यांनी अनेकांना जखमी केल्याचंही आपण पाहिलं आहे. त्यामुळे असे प्राणी पाळीव प्राण्यांसह माणसांसाठीही धोकादायक ठरु शकतात. शिवाय अशा वन्य प्राण्यांनी घरात घुसून हल्ला केल्याच्या घटनांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा घटनांमध्ये अनेकदा हल्ला करणारे प्राणी पळून जातात तर काही वेळा त्यांना पकडण्यात नागरिकांना यश येतं.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्या एका घरासमोरच्या उंच भिंतीवरुन घराच्या गेटच्या आत उडी मारतो आणि व्हरांड्यातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करतो. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा गळा जोरात पकडून ठेवल्याचंही दिसत आहे. व्हिडीओतील कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात मरणार असं वाटतं, पण कुत्रा सहजपणे हार मानत नाही तो बिबट्याशी झुंज देत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. कुत्र्याच्या सुदैवाने त्याचा मालक ऐनवेळी घरातून हातात काही शस्र घेऊन बाहेर आल्यामुळे बिबट्या कुत्र्याला सोडून आला तसाच उडी मारुन पळून गेल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- सिंहापासून वाचण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होतं माकड तितक्यात…, मन हेलावणारा Video व्हायरल

व्हिडिओ पाहणाऱ्यांना बसला धक्का –

हेही पाहा- जहाजातून उडी मारणं जीवावर बेतलं, पाण्यात पडायच्या आधीच शार्कने गिळलं; धक्कादायक Video व्हायरल

बिबट्याच्या हल्ल्याचा सर्व थरार घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. हा भयंकर बिबट्याचा व्हिडिओ ppredator_wildlifevids नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे आणि ही घटना कधी घडली? याबाबतची काही माहिती पोस्ट धारकाने दिलेली नाही. पण हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 11:01 IST
ताज्या बातम्या