Leopard Hunting Dangerous Video : जंगलात हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात नेहमीच भटकत असतात आणि कमकुवत प्राण्यांना त्यांच्या सापळ्यात अडकवतात. सोशल मीडियावर वाघ, सिंह, बिबट्याच्या शिकारीचे थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण एका खतरनाक बिबट्याच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कारण बिबट्याने एका प्राण्याची शिकार केल्यानंतर काही सेकंदातच झाडावर धूम ठोकली. वजनदार प्राण्याला मानेला धरून झाडावर चढतानाचा बिबट्याचा थरारक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. बिबट्याच्या या व्हिडीओनं अनेकांना चकीत केलं आहे.

बिबट्या चपळाईने शिकार करण्यात माहिर असतो. त्याची शिकार करण्याची पद्धत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एका बिबट्याच्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण हा बिबट्या वजनदार प्राण्याला जबड्यात अडकवून झाडावर चढत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे दृष्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिकार केलेल्या प्राण्याला बिबट्या उंच फांदीवर घेऊन जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कारण कोणता दुसरा प्राणी त्याची शिकार घेऊन जाऊ नये. बिबट्याच्या शिकारीचे असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.

नक्की वाचा – Video: आनंद महिंद्रांनी हॉटेल रुमचा थरकाप उडवणारा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “एक रात्रही…”

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं आहे की, जबड्याची ताकद जबरदस्त आहे. १९ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर २८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिलेली लोक या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, बिबटे जबरदस्त असतात.