Lion Lioness Fight Video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंह आणि सिंहीण शिकार करताना दिसत आहेत. मात्र, शिकार करताना अचानक सिंह आणि सिंहीण मध्ये भांडण होते आणि याचा फायदा घेऊन शिकार पळून जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक जीवनात असे तुम्ही क्वचितच पाहिले असेल. पण असे दृश्य एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे. यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे.

सिंह आणि सिंहीणीच्या या लढाईत कोण कुणावर भारी पडलं हे तुम्हीच पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सिंह आणि सिंहिणची एकमेकांशी लढाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत हे स्पष्ट लक्षात येत आहे की, दोन्ही ही सिंह सिंहीण मागे हटण्यासाठी तयार नाही. ते एकमेकांवर आपल्या पंजाने वार करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर दोघेही एकमेकांना टफ फाईट देत असल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि सिंहिण एकमेकांशी लढाई करत आहेत. खड्ड्यात एक सिंहीण आधीच बसलेली आहे. सिंह तिच्याकडे रागात जातो. मग दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. दोघेही एकमेकांवर हल्ला करु लागतात. सिंहिण अतिशय वेगानं सिंहावर तुटून पडतात.

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
bear and tiger viral video loksatta
Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार
yavatmal forest marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news
यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे.  नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात.