सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. ट्विटर, इन्स्टा, यूट्यूबवर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. पण, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. त्यानंतर ते व्हिडीओ सर्वत्र शेअर होत राहतात. काही व्हिडीओ हसवतात, पण काही व्हिडीओ घाबरगुंडी उडविणारे असतात; जे पाहिल्यानंतर आपण क्षणभर भांबावून जातो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. नसतं धाडस कसं अंगाशी येऊ शकतं हे या व्हिडीओतून दिसतंय. आतापर्यंत आपण पायाखालची जमीन सरकली, अशी म्हण अनेकवेळा ऐकली असेल. पण, प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडेल अशी ही घटना आहे.

मगर हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. मगरीबरोबर पंगा घेणं म्हणजे जणू मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण मगर पाण्यात किंवा चिखलात लपून बसते आणि संधी मिळताच जोरदार हल्ला करते. बरं, मगरीच्या शरीराची रचनादेखील अशी असते की, ज्यामुळे तिला साध्या डोळ्यांनी पाहणंदेखील कठीण होतं. तिच्या जबड्यात आलेली शिकार पुन्हा माघारी जाणं थोडं अशक्यच असतं. एवढ्या धोकादायक प्राण्यालाही काही जण घाबरत नाहीत. बिनधास्तपणे त्यांना हात लावतात, जवळ जातात. यात एका मुलाचा व्हिडीओ समोर आलाय, तो मगर असलेल्या तलावात उडी मारतो आहे.

(हे ही वाचा : पाठीमागून मृत्यू आला अन्…अचानक समोरुन वेगानं ट्रेन आली; रेल्वेखाली आला तरुण, घटनेचा VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी )

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. वास्तविक एक पूल दिसत आहे, जो पूर्णपणे मगरींच्या बाळांनी भरलेला आहे. काहीही विचार न करता पोहायला जाण्यासाठी एक मूल याच तलावात उडी मारते. व्हिडीओमध्ये हे मूल मगरीच्या बाळांमध्ये पोहत असल्याचे दिसत आहे. मुलाला थोडीशीही भीती वाटत नाही. मगर त्याच्या आसपास असतानाही तो अगदी बेधडकपणे पाण्यात उडी घेतो. काही मगरी त्याच्या अंगावर खेळत आहेत. त्या मुलाला कसल्याही प्रकारचं भय नाही. मात्र, असं धाडस कधी जीवावरही येऊ शकतं. दरम्यान, व्हिडीओ पाहिल्यानंतर या मुलाने हे कसे केले म्हणून लोक घाबरू लागले आहे. मुलाचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तुम्हीही चकित व्हाल. काहीच वेळात व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/purankumawat76/status/1792940643259736185?ref_src

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @puranumawat76 नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘खतरों के खिलाडी, खूप भयानक.’ वृत्त लिहिपर्यंत १७०० लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजलेलं नाही. अनेक लोकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.