मध्य प्रदेशमधल्या नीमचमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या १०० कोटींच्या संपत्तीचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. याची चर्चा देशभर सुरू आहे. संपत्तीबरोबर आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला देखील ते सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. अनामिका आणि सुमित राठोड असं या दाम्पत्याचं नाव असून, पुढील आठवड्यात ते सूरतमध्ये दीक्षा घेणार आहेत.

राठोड कुटुंब हे नीमचमधल्या सधन कुटुंबापैकी एक आहे. सुमित स्वत: नीमचमधले प्रतिष्ठित व्यवसायिक असल्याची माहिती ‘नेटवर्क १८’ ने दिली आहे. विशेष म्हणजे सुमितने लंडनमधल्या प्रसिद्ध विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केल्याचंही समजतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमितने आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली. फॅक्टरीसोबत त्यांच्या नावावर कोट्यवधीची मालमत्तादेखील आहे.

वाचा : या फोटोला ‘अप्रतिम’ म्हणताय?, त्याआधी सत्य तरी जाणून घ्या!

तर त्यांची पत्नी अनामिका ही इंजिनिअर आहे. लग्नापूर्वी एका बड्या कंपनीत त्या काम करत होत्या. त्या अभ्यासातही हुशार असून, दहावी आणि बारावीमध्ये राजस्थान बोर्डातून त्या पहिल्या आल्या होत्या. काही वर्षांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. अनामिका आणि सुमित या दोघांनाही तीन वर्षांची मुलगी आहे. पण संपत्तीचा त्याग करून आणि आपल्या गोंडस मुलीलाही सोडून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय पक्का केला आहे.

या दोघांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. एवढ्या छोट्या मुलीला सोडून कोणी संन्यास कसा घेऊ शकतो? यावर एकदा विचार करावा असेही सल्ले त्यांना दिले. पण जगात अनाथ मुलं आहेत, त्यांना कुठे आई वडिल असतात? त्याचेही संगोपन होतेच ना! असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : एकेकाळी रस्त्यावर झोपणारा ‘तो’ तरुण आज कोट्यवधीचा मालक!