Magical splash trend Little Girl Cute Reaction Video : तुम्ही सोशल मीडियावर रोज अॅक्टिव्ह असाल, तर तिथे काय ट्रेंडिंग आहे, काय व्हायरल होतेय या गोष्टींची तुम्हाला बरीच माहिती असेल. कारण- प्रत्येक वेळी काही दिवसांनी सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतो. त्यात सध्या सोशल मीडियावर पाणी आणि हळदीचा (Magical splash trend) एक भन्नाट ट्रेंड सुरू आहे, ज्यात लोक एक ग्लास पाणी घेतात आणि तो पाणी भरलेला ग्लास फोनच्या फ्लॅशवर ठेवतात. त्यानंतर त्या ग्लासात हळद टाकली जाते. मग जे काही घडते, त्याने वातावरण बदलते. या ट्रेंडचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एक चिमुकली अशी काही रिअॅक्शन देतेय की, पाहून तुम्हालाही हसू येईल.
चिमुकलीने डोळे केले मोठे
सोशल मीडियावर काही व्हिडीओंनंतर तुम्हाला एक व्हिडीओ असा दिसेलच, ज्यात लोक पाण्यात हळद टाकण्याचा तो ट्रेंड फॉलो करतायत. पाण्यात हळद टाकताच त्यांची काय रिअॅक्शन होती तीदेखील या व्हिडीओत कॅप्चर केली जाते. अशा प्रकारे एका चिमुकली आणि आई हा ट्रेंड फॉलो करत होती. त्यासाठी चिमुकलीची आई पाण्याने भरलेला ग्लास मोबाईलच्या फ्लॅशवर ठेवते. त्यानंतर चिमुकलीला त्या ग्लासच्या समोर बसवून ग्लासमध्ये हळद टाकते. मग लगेचच ग्लासमधील पाणी हलके पिवळे होताना दिते. ते पाहून चिमुकली डोळे मोठे करून पाहू लागते. चिमुकलीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसून येत आहेत. आपण काहीतरी वेगळं अन् अद्भुत पाहतोय, असे तिला वाटू लागते. पण, तिची हीच गोंडस रिअॅक्शन पाहून कोणालाही हसू येईल. तिने दिलेल्या याच रिअॅक्शनमुळे हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
चिमुकलीचा हा गोंडस व्हिडीओ एक्सवर @rajini198080 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये ‘ब्यूटी’ असे लिहिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना चिमुकलीची ही रिअॅक्शन फार आवडली आहे, त्यामुळे कमेंट्समध्ये अनेकांनी हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत.