शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सध्या राज्यातील सत्तासंघर्षाचे केंद्र सध्या गुवाहाटी बनलेलं असताना या सत्ताकारणाच्या वातावरणात एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतेय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही ऑडिओ क्लिप असून यातील त्यांचे संवाद सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत. त्यांच्या ऑडिओ क्लिपमधले हे संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेत. त्यांच्या या संवादावर नेटकऱ्यांनी वेगवेगळे मीम्स शेअर करत आपल्या क्रिएटीव्हिटीला जागं केलंय. या वेगवेगळ्या मीम्सचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊसच पडलाय. हे मीम्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार हे गुवाहाटीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून थांबले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे ग्रामीण भागातील मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने शहाजी बापू पाटील यांना कॉल केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा हा संवाद मजेदार आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसून आले. “काय झाडी… काय डोंगर… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा शब्द धरून नेटकऱ्यांनी देखील काही मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे. हे मीम्स एकदा पाहाच.

इथे पाहा काही मजेदार मीम्स:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल क्लिपमध्ये शहाजीबापू मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. गुवाहाटीमध्ये त्यांच्यासाठी हॉटेलमधील व्यवस्था कशी आहे, हे सांगताना त्यांनी हे वर्णन केलं आहे. पण ज्या स्टाईलने त्यांनी सांगितलं आहे ती पद्धत लोकांना फार आवडू लागली आहे.