Premium

१५ सेकंदात मुलांनी केली २ लाखांची चोरी, चालत्या बाईकवरील पैशांची पिशवी हिसकावली, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

अल्पवयीन मुलांनी बाईकवरुन निघालेल्या व्यक्तीच्या पिशवीतील पैसे चोरल्याची घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

children stolen 2 lakh rupees
अल्पवयीन मुलांनी केली २ लाखांची चोरी. (Photo : Social Media)

हरियाणातील महेंद्रगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी अवघ्या १५ सेकंदात एका बाईकस्वाराचे २ लाख रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना शहरातील बालाजी चौकात घडली असून या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरूवात केली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन मुलांनी बाईकवरुन निघालेल्या व्यक्तीच्या पिशवीतील पैसे चोरल्याची घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन अल्पवयीन मुलं बाईकवरुन निघालेल्या एका व्यक्तीची नोटांनी भरलेली पिशवी काढताना स्पष्टपणे दिसत आहेत. पीडित धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, ११ वाजण्याच्या सुमारास त्याने सिनेमा रोडवरील बँकेच्या शाखेतून दोन लाख रुपये काढले. वाहतूक कोंडीमुळे त्याने बाईकचा वेग कमी केला, याच दरम्यान दोन मुलांनी बाईकला अडकवलेली पैशांची पिशवी पळवली.

हेही पाहा – चक्क कारप्रमाणे बाईकला पायाजवळ जोडला एक्सलेटर, अनोख्या जुगाडाचा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भारत चंद्रावर…”

अन्.. १५ सेकंदात पळवले २ लाख –

व्हायरल होत असलेल्या २८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक मुलगा मुद्दाम बाईकच्या पुढे चालताना दिसत आहे. तर यावेळी धर्मेंद्र यांनी आपल्या बाईकचा वेग कमी केल्याचं दिसत आहे. बाईक थोडी पुढे जाताच आणखी एक मुलगा बाईकजवळ येतो आणि काही क्षणात बाईकला अडकवलेल्या पिशवी पळवून नेतो, ही संपूर्ण घटना बालाजी चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पोलिसांनी नोंदवला गुन्हा

दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असंही पोलीस म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahendergarh rs 2 lakh stolen from a moving bike in 15 seconds incident captured in cctv jap

First published on: 03-12-2023 at 11:34 IST
Next Story
Video: शॉर्टकट जीवावर बेतला! नागपूर-तुळजापूर महामार्गावर काळजाचा ठोका चुकावणारा अपघात; पती-पत्नी हवेत उडून…