देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आणखी एक क्रुर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मंदिरामध्ये एका युवकाने महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील कोल्लर मंदिरात ही ह्रद्य हेलावून टाकणारा प्रकार घडला. मंदिरातील सीसीटिव्हीमध्ये महिलेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा प्रकार कैद झाला आहे. ज्या महिलेवर हल्ला झाला तिचे नाव कुमारी असे असून ५० वर्षाच्या या महिलेवर क्रुरपणे हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. संबंधित महिला या मंदिर प्रशासनातील सदस्य आहे. या महिलेच्या वडिलांची आणि आरोपी संतोष यांच्यातील जून्या वादातून हे कृत्य घडल्याचे समजते. कुमारी नावाच्या महिलेचे वडिल आणि संतोष यांच्यामध्ये दहा वर्षापूर्वी पैशावरुन वाद झाला होता. दहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात ठेऊन २५ वर्षाच्या तरुण संतोषने तलवारीच्या साहय्याने या महिलेवर हल्ला केला.
बेसावध अवस्थे. आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या महिलेने आरडा ओरडा केल्याने मंदिर परिसरातील नागरिकांनी महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. पहिल्यांदा संतोषला दोन तीन लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांना बाजूला करत महिलेवर वार करत राहिला. त्यानंतर अनेक लोकांनी मिळून त्याला नियंत्रणात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान महिलेवर अमानुष हल्ला करणाऱ्या आरोपी संतोषवर पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा नोंदविला आहे.
निर्दयीपणे हल्ला हा पैशाच्या कारणावरुन झाला असला तरी, जखमी महिलेचे वडिल आणि आरोपी यांच्यात झालेल्या व्यवहाराची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पैशासाठी महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पाडण्याचा निर्दयी कृत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.