King Cobra Viral Video : रस्त्यावरून येजा करत असताना अचानक साप दिसला की अंगावर शहारे उभे राहतात. विषारी सापाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सापापासून सर्वच लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण एका तरुणाने जगातील सर्वात जास्त विषारी सापंपैकी एक समजल्या जाणाऱ्या किंग कोब्राला थेट घरी आणले. एव्हढच नाही तर त्या किंग क्रोब्राला पठ्ठ्याने चक्क घराच्या अंगणातच आंघोळ घातली. महाकाय किंग कोब्रा समोर असूनही त्याने फण्यावर हात टाकला अन् तितक्यात अंस काही घडलं, जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. किंग कोब्राचा दंश झाल्यावर जीव वाचण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे या सापाच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे.

किंग कोब्राला एका तरुणाने आंघोळ घातली पण घडलं असं काही….

किंग कोब्रासारख्या खतरनाक सापासोबत खेळ करुन जीव धोक्यात टाकणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्नेक शो करताना काही सर्प मित्रांना विषारी सापांनी दंश केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सापाच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होतो, हे सर्वांनाच माहितेय. तरीही काही जण लाखमोलाच्या जीवाला कवडीमोल करून सापांसोबत खेळ करण्याचा प्रयत्न करतात.

पण काही वेळेला साप अंगावर धावून आल्यावर अनेकांची फजिती होते. कोणत्या क्षणी साप फणा मारेल, याचा अंदाजही कुणाला येत नाही. तरीही काही लोक सापाच्या फण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. या तरुणानेही किंग कोब्राच्या फण्याला हात लावला. त्यानंतर साप दंश करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या तरुणाने स्वत:ला कसंबसं सावरलं आणि दोन पावले मागे हटला.

नक्की वाचा – १९४७ चे रेल्वे तिकिट व्हायरल! भारत-पाकिस्तानच्या रेल्वे प्रवासाची किंमत वाचून व्हाल थक्क

इथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Chennai Talkies (@chennaitalkies)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंग कोब्राचा हा थरारक व्हिडीओ चेन्नई टॉकिज नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केलं असून भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. किंग कोब्रा साप इतका विषारी असतो की, एखाद्या माणसाला चावा घेतल्यावर रुग्णालयात वेळेवर पोहोचता न आल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. किंग कोब्राने दंश केल्यावर शरीरात मोठ्या प्रमाणात सापाचं विष पसरलं जातं. इतर सापांच्या तुलनेत किंग कोब्रा सापाचं वेनम अतिशय घातक असतं. त्यामुळे किंग कोब्रासह इतर सापांच्याही जवळ जाणे जीवघेणं ठरु शकतं. जंगलात फिरताना सापांपासून सावध राहा, सापांच्या जवळ जाऊ नका, अशा सूचना वन विभागाकडून नेहमीच दिल्या जातात. पण काही लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि सापाची शिकार होतात.