Viral : झुरळांचा नायनाट करण्यासाठी त्यानं घर पेटवलं

यात तो जखमी झाला

झुरळ’ म्हणजे आपल्यासाठी त्यातून महिलावर्गांसाठी किती तिरस्काराचा विषय हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे या झुरळांचा नायनाट करण्यासाठी कितीही उर्जा खर्ची पडली तरी बेहत्तर असा विचार समस्त महिलावर्ग करत असतील तर आश्चर्य वाटायला नको. किचनमध्ये झुरळ दिसलं आणि बायको किंवा घरातली महिला ओरडत आली तर त्या झुरळाच्या मिश्या पकडून त्याला तिच्यासमोर नाचवण्यात काहींना जो असुरी आनंद मिळतो ते वेगळं सांगायला नको. या झुरळांना पळवून लावणं एखादीसाठी कठीण काम असलं तरी पायांच्या अंगठ्यानं झुरळाला चिरडण्याएवढं सोप्पं काम पुरुषासाठी नसेल. तर, हा झाला गंमतीचा भाग पण ऑस्ट्रेलियामधील माऊंट इसामध्ये  राहणाऱ्या एका व्यक्तीनं झुरळांचा नायनाट करण्यासाठी आपलं अर्ध घरच पेटवल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे.

एबीसी न्यूजच्या हवाल्यानुसार हा व्यक्ती झुरळ्यांच्या उपद्रवाला कंटाळला होता, तेव्हा त्यांनं झुरळांना मारण्यासाठी  स्प्रेचा वापर केला. हा स्प्रे ज्वालाग्रही असल्याचं त्यावर लिहिलं असतानाही या व्यक्तीनं त्याचा वापर केला. त्यामुळे घराच्या किचनमध्ये स्फोट होऊन किचनकडील भाग पूर्णपणे जळला. यात तो गंभीर जखमीही झाला आहे. स्फोट झाल्याची बातमी कळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं या परिसरात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यात घरातील इतर लोक मात्र बचावले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man blow up his house while trying to get rid of cockroaches