man claim US colleagues treated India team like their personal task dumping ground post goes viral : बऱ्याचदा मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कमाचे आउटसोर्सिंग केले जाते. याबाबत भारतीय डेटा सायंटिस्ट कपिल भट्ट यांनी नुकतेच केलेली एक्सवरील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये भट्ट यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील एका बायोटेक फर्ममध्ये सहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यानंतर त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, त्यांचे अमेरिकेतील सहकारी हे भारतीय कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देत असत.भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सहकाऱ्यांना कंपनीत सातत्याने कंटाळवाणे काम किंवा अगदी तातडीने करावयाचे काम दिले जात असे. एकंदरीत भारतीय कर्मचारी हे त्यांच्या अमेरिकेतील सहकाऱ्यांसाठी एक प्रकारे ‘डंपिंग ग्राऊंड’ बनले होते.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

भट्ट यांनी कामाच्या स्वरूपातील एक मोठा विरोधाभास त्यांच्या पोस्टमध्ये दाखवून दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील कर्मचारी त्यांचा दिवस भारतातील टीमला कामे सोपवण्यात, अनावश्यक बैठकांमध्ये आणि काल लवकर संपवण्यात घालवतात. तर दुसरीकडे भारतातील टीमला कामाचा प्रचंड भार सांभाळावा लागत असे, ज्यामध्ये बोरिंग, श्रेय मिळणार नाही असे आणि तातडीने करण्याच्या कामांचा समावेश असे.

भट्ट यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझे अमेरिकन सहकारी भारतातील टीमला त्यांचे पर्सनल टास्क डंपिंग ग्राउंड असल्याप्रमाणे वागवत. कंटाळवाणे काम? इंडिया टीमला, तातडीचे काम? इंडिया टीमला, आणि श्रेय मिळणार नसलेले (thankless) काम? इंडिया टीमला. तेव्हा त्यांच्या कामाचा दिवस हा साधारणपणे इंडिया टीमला काम पाठवणे, बिनकामाच्या मिटिंग्ज घेणे,  आरामात बसणे आणि नंतर लॉग ऑफ करणे असा होता.”

या पोस्टमुळे भारतातील वर्क कल्चरबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.या पोस्टला ५७९,०० यापेक्षा जास्त व्हयूज मिळाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “माझ्या सोसायटीमधील सर्व आयटीमध्ये काम करणारे लोक मला हेच सांगत आहेत. वरवरपणे, ऑनसाइट काम करणारे भारतीय देखील भारतातील टीमबरोबर असेच वागतात आणि फक्त PR रिव्ह्यू करतात.” इतरही अनेकांनी यावर त्यांचे मत दिले आहे.