रशियातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या एका व्हायरल झालेल्या विचित्र स्टंटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सेर्गे कोसेन्कोने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो असं काही करताना दिसतोय की आपणच विचारात पडू. त्याने त्याच्या कारच्या छताला मैत्रिणीला बांधले आहे आणि अशातच तो आपली गाडी पूर्ण मॉस्कोमध्ये फिरवत असल्याचे दिसून येत आहे. मिस्टर कोसेन्कोने या आठवड्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फुटेजमध्ये तो हिरव्या रंगाची बेंटली (Bentley) ही कार चालवताना दिसतो आहे. तसेच  त्याच्या एका हातामध्ये त्याने हातकडी घातली होती जी त्याच्या मैत्रिणीलाच्या हातालाही दिसत आहे.  त्याने तीच तोंडही टेपने सील केलेले दिसत आहे.

दशलक्ष नेटीझन्सनी पाहायला व्हिडीओ

स्थानिक वृत्तपत्र लाइफच्या मते,  मिस्टर कोसेन्कने एका कमेंटमध्ये स्पष्ट केले की हा स्टंट अनेक ‘विश्वास चाचण्यांपैकी’ जोडप्याने एकत्र करायचा एक स्टंट आहे असं तो सांगतो. सोमवारी शेअर केल्यापासून, व्हिडीओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत १.४ दशलक्षाहून अधिक लोकांनी बघितलं आहे. ८६.५ हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवत लाईक केलं आहे. अवघ्या ३० सेकंदाच्या या व्हिडीओला बघून काहींना आनंद झाला, तर काहींनी धोकादायक स्टंटबद्दल चिंता व्यक्त केली. एक युजर म्हणतो की “हा काय मूर्खपणा आहे?”. तर दुसरा म्हणतो की “मला यात काय गंमत आहे ते दिसत नाही.”

घटनेची पोलिसांकडून चौकशी

रशियातील वाहतूक पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत, असे लॅडबिबलने म्हटले आहे. मॉस्को स्टेट ट्रॅफिक इन्स्पेक्टोरेटच्या कर्मचाऱ्यांनी इंटरनेटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या वस्तुस्थितीची तपासणी सुरू केली आहे, ज्यात एका मुलीला चालत्या कारच्या छतावर बांधण्यात आले आहे, असे मॉस्को स्टेट ट्रॅफिक इन्स्पेक्टरेटने एका निवेदनात म्हटले आहे. प्राथमिक तपासात असेही आढळले आहे की स्टंटसाठी वापरलेली कार कोसेन्कोची नाही. उधार घेतलेल्या लक्झरी कारवर खरे तर ६८  न भरलेले दंडही आहेत.

तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?