Man humiliated wife viral video: अनेकदा सोशल मीडियावर असे काही पाहायला मिलते की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं कठीण जातं. ओडिशातील पुरी इथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लेक्चरर पतीने त्याच्या शिक्षिका असलेल्या पत्नीसोबत असं काही केलं की तुम्हाला ऐकून धक्काच बसेल. या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता आणि पत्नी भाड्याने घेतलेल्या वेगळ्या घरात राहत होती. एक दिवस पती त्याच्या चार-पाच मित्रांसह तिच्या घरी पोहोचला आणि जबरदस्तीने आत पोहचला. त्यावेळी तिच्या घरी एक पुरूष विद्यार्थी आधीपासूनच होता.
त्या सर्व प्रकारानंतर पतीने त्याच्या पत्नीला प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत त्याने घराबाहेर काढले. पतीने पत्नीच्या घरी असलेल्या त्या पुरूषाला तिला हार घालायला सांगितले आणि तिचे तोंड कापडाने बांधले. संबंधित घटना मंगळवारी रात्री घडली.
या महिलेचा पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्या पुरूषाचे सर्व कपडे फाडले आणि तशाच अवस्थेत पत्नी आणि त्याची रस्त्यावर मारहाण करत धिंड काढली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ही महिला वारंवार तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा सर्व प्रकार घडत असताना रस्त्यावर उभे असलेले लोक हे दृश्य पाहत होते आणि व्हिडीओ काढत होते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, महिलेच्या गळ्यात हार घालून तिचा अपमान करण्यात आला आहे आणि धिंड काढली. पतीचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी पतीसह दोन जणांना ताब्यातही घेतलं आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे.