scorecardresearch

माणूस आहे की बाहुबली? तरुणाने एकाचवेळी उचलल्या दोन बाईक, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील व्यक्तीच्या स्टंटचा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल

माणूस आहे की बाहुबली? तरुणाने एकाचवेळी उचलल्या दोन बाईक, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील व्यक्तीचा भीम पराक्रम पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. (Photo : Instagram)

इंटरनेटमुळे जग इतको जवळ आलो आहे की, जगभरातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपल्यापर्यंत काही क्षणात पोहचत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे आपण कधीही न पाहिलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील व्यक्तीचा पराक्रम पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी फेमस होण्यासाठी असे धोकादायक स्टंट करु नयेत, असा सल्लाही दिला आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनी देखील असे धाडस करु नये असं आवाहनदेखील अनेक नागरिकांनी केलं आहे. कारण, असा स्टंट करणं आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं असं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- शाळेच्या ड्रेसमध्ये या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, व्हायरल Video एकदा पाहाच

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील व्यक्ती एकाच वेळी दोन बाईक उचलताना दिसत आहे. सुरुवातीला या माणसाच्या खांद्यावर दोरीच्या साहाय्याने लाल रंगाची स्कुटी बांधल्याचं दिसत आहे. त्याचवेळी तो समोर उभी असलेली दुसरी दुचाकी उचलण्याचा प्रयत्न करतो. धक्कादायक बाब म्हणजे अंगावर आधीच दोन बाईक घेतलेल्या असताना आणखी एक लहान मुलगा समोरच्या दुचाकीवर येऊन उभा राहत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा असला विचित्र स्टंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही पाहा- Video: कारला रस्ता देण्यासाठी जेसीबी चालकाचं भलतंच धाडस, भररस्त्यात JCB वर उचलला अन्….

हा व्हिडिओ wild_animal_pix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये धक्कादायक चेहऱ्याची इमोजी दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असेल यात शंका नाही. शिवाय या अनोख्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ज्या युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे ते यावर वेगवेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने, ‘कोणीही असलं भलतं धाडसं करु नये,’ अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, असा मुर्खपणा करायची काहीच गरज नव्हती अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 16:44 IST

संबंधित बातम्या