नवनवीन पद्धती आणि साहित्य वापरून जुन्या किंवा पारंपरिक पदार्थांमध्ये प्रयोग करण्याचा सध्या ट्रेंडच आहे. विशेष म्हणजे हे बहुतेक सर्वच नवे प्रयोग खवय्यांना आवडतात आणि यशस्वी देखील होतात. मात्र, हे प्रयोग करताना वेळीच थांबलं नाही तर एखादा अजब पदार्थ तुमच्या वाट्याला येऊ शकतो. आता एक प्रश्न, तुम्हाला अंडी कशी खायला आवडतात? म्हणजे खरंतर अंड्यापासून अनेक पदार्थ बनतात. अगदी ऑम्लेट, सॅन्डविचपासून बिर्याणीपर्यंत. पण तुम्ही कोणाला अंड्यात कोल्ड्रिंक टाकताना पाहिलंय का? तुम्ही अशा पदार्थाची कल्पना तरी केलीय का? नाही ना. मग हा अनोखा प्रयोग करणाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओबद्दल जाणून घ्याच. एक व्यक्तीने अंड्यामध्ये चक्क फॅंटा हे प्रसिद्ध ऑरेंज फ्लेवर्ड कोल्ड्रिंक टाकलं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओवर प्रत्येक ट्विटर युझर एकच प्रश्न विचारतोय “का रे बाबा, कशासाठी?” तुम्हालाही असंच वाटतंय का? जाणून घेऊया हा अनोखा प्रयोग नेमका काय?

इंडिया ईट मॅनियाचा लोगो असलेला हा व्हिडिओ ट्विटर युजर ईशा हिने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना  ईशा हिने “आई मला उचल, हे अंड्यासोबत फॅंटा तळत आहेत” असं गंमतीदार कॅप्शन देखील दिलं आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या सुरत येथील एक स्टॉलचा आहे. जिथे अंड्यांच्या विविध प्रकारच्या रिसिपीज बनवल्या जात असतानाच त्यातील एकामध्ये थेट फॅंटा टाकण्यात आलं आहे.

चक्रावलेल्या ट्विटर युझर्सनी विचारलं, “व्हाय? का? काहे? क्यू?”

अंड्याच्या या अनोख्या रेसिपीच्या सुरतमधील या व्हिडीओला ४ ऑगस्ट रोजी शेअर झाल्यापासून तब्बल २,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. दरम्यान, या व्हिडीओला विविध गंमतीदार कॉमेंट्स देखील आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून ट्विटर युझर्स चांगलेच चक्रावल्याचं असंख्य कॉमेंट्समधूनच दिसत आहे. कोणी म्हणतंय कि, “आपण हा प्रयोग सर्वात आधी आपल्या शत्रूवर करायला हवा” तर कुणी विचारतंय, “व्हाय? काहे? का? क्यू?” हा व्हिडीओ पाहून एकाने तर लिहिलंय कि, “का? खाण्यासाठी आपल्याकडे इतके सर्वोत्तम पर्याय असताना हेच का?”