मध्य प्रदेशातील सतना शहरातील सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा रुग्णालयात शनिवारी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील दृश्यासारखेच दृश्य पाहायला मिळाले. रुग्णाला दुचाकीवरून घेऊन एक व्यक्ती हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरला. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं न ऐकता आत शिरला. आता या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘थ्री इडियट्स’ या बॉलिवूड चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये चित्रपटाचा नायक आमिर खान एका रुग्णाला स्कूटरवर घेऊन आपत्कालीन वॉर्डमध्ये पोहोचतो. सतना जिल्हा रुग्णालयात हे चित्रपटाचे दृश्य पाहायला मिळाले. रात्री उशिरा नीरज गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या आजोबांची प्रकृती खालावली. आपल्या आजोबांना त्या तरुणाने दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात आणले. नीरज गुप्ता यांनी ना पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली ना रुग्णाला स्ट्रेचरवर नेले. या तरुणाने रुग्णाला बाईकवर बसवले आणि थेट रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले आणि त्यांना ताबडतोब बेडवर झोपवले गेले. मग त्याने बाईक फिरवली आणि पार्किंगमध्ये नेली.

Hero MotoCorp will be launching new updated Destini 125
Hero MotoCorp : गणेश चतुर्थीला लाँच होणार हिरोची ‘ही’ नवीन स्कूटर? टिझर झाला रिलीज, नवीन डिझाइनसह असणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Hyundai Alcazar Facelift New Tvc Released With Brand Ambassador Shahrukh Khan
Hyundai Alcazar Facelift: नवीन ह्युंदाई अल्काझार कारची मार्केटमध्ये जोरदार चर्चा; शाहरुख खानसोबतचा नवा व्हिडिओ समोर
Virat Kohli Spotted Travelling by Train
विराट कोहलीने लंडनमध्ये ट्रेन पकडण्यापूर्वी फोटो घेणाऱ्या चाहत्याला काय म्हटलं? Video होतोय व्हायरल
Barcelona sensation Lamine Yamal's father stabbed; suspects in custody
Lamine Yamal : धक्कादायक! स्पेनचा फुटबॉलपटू लॅमिन यमालच्या वडिलांवर चाकू हल्ला, हॉस्पिटलमध्ये दाखल
Mumbai Crime News
Mumbai Crime : दादरला तुतारी एक्स्प्रेसमध्ये ट्रॉली चढवताना दोघांना घाम फुटला, बॅग उघडताच आढळला रक्ताने माखलेला मृतदेह
Noida Girl Sexual Assault
Noida Girl Sexual Assault: ‘पावसात भिजत असताना त्याने माझे कपडे फाडले, नंतर पोलिसांनी…’, तरुणीचे गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल
Paris Olympics 2024:Chinese Olympic badminton player, Huang Yaqiong got a proposal from a teammate
Paris Olympics 2024: गोल्ड मेडलनंतर मिळाली डायमंड रिंग, बॅडमिंटन कोर्टमध्येच चिनी खेळाडूने गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

रुग्णालयाच्या आत बाईक चालवताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. तरुणाने आपल्या आजारी आजोबांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये बाईकवरून नेले आणि त्यांना तातडीने बेडवर झोपवले. यानंतर तो दुचाकी फिरवून पार्किंगमध्ये घेऊन गेला. दरम्यान, रुग्णालयात हे चित्र पाहून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

(हे ही वाचा : ‘या’ गाण्यावर वर्दीतील महिला पोलिसाचा डान्स पाहून अभिनेत्री नोरा फतेहीलादेखील विसरुन जाल; VIDEO तुफान व्हायरल )

येथे पाहा व्हिडिओ

रुग्णालयाच्या नियमांचे उल्लंघन करून इमारतीच्या आत दुचाकी घेऊन गेलेला नीरज गुप्ता हा कंत्राटी पद्धतीने काम करणारा संगणक ऑपरेटर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डच्या डॉक्टरांना ही बाब कळताच त्यांनी नीरज गुप्ता यांना खडसावले. भविष्यात असे न करण्याचा त्याला इशाराही दिला आहे. व्हिडिओमध्ये कैद झालेल्या या घटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. ही संपूर्ण घटना कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.