जर तुम्हाला विचारले की तुम्ही तुमच्या टोपीवर किती अंडी ठेवू शकता? अर्थात, तुमचे उत्तर एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन असेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीने दोन-तीन न्हवे तर ७३५ अंडी त्याच्या टोपीच्या वर ठेवून विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटते की या व्यक्तीने हे कसे केले?

हा व्हिडीओ शेअर करताना, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने कॅप्शनमध्ये लिहिले, ग्रेगरी दा सिल्वा एकाच कॅपच्या वर ७३५ अंडी घेऊन जात आहेत. ग्रेगरीबद्दल अधिक माहिती देताना, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे, गेग्री दा सिल्वा पश्चिम आफ्रिकेतील बेनिनचा रहिवासी आहे.चीनमध्ये सीसीटीव्हीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या विशेष शो दरम्यान त्याने ही अनोखी कामगिरी केली आहे. हा महान विक्रम करण्यासाठी ग्रेगरीला तीन दिवस लागले. व्हिडीओमध्ये, आपण ग्रेगरी अंड्यासह समतोल साधताना पाहू शकता.

(हे ही वाचा: म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी रस्त्यावर सादर केलं गाणं; हृतिक रोशननेही केलं कौतुक)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ ८५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे. ग्रेगरीची ही थक्क करणारी कामगिरी पाहिल्यानंतर, सोशल मीडीया वापरकर्ते सतत त्यांचे अभिप्राय देत आहेत. एका वापरकर्त्याने यावर कमेंट करताना लिहिले, हा खरोखरच एक महान रेकॉर्ड आहे. क्वचितच कोणी तो मोडू शकतो. त्याचवेळी, दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रश्न विचारला आहे की ग्रेगरीने त्याच्या डोक्यावर जेवढी अंडी ठेवली आहेत त्याचे वजन किती असेल?

(हे ही वाचा: Video: चिमुरडीने वडिलांना पायलट म्हणून पाहिलं अन्…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, ग्रेगरीच्या स्तुत्य रेकॉर्ड दरम्यान, एका वापरकर्त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर टिप्पणी केली की त्याने हा विक्रम करण्यासाठी किती पैसे दिले? या व्यतिरिक्त, बहुतेक वापरकर्ते इमोटिकॉन्सद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर, असे अनेक वापरकर्ते आहेत जे व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आपल्या मित्रांना आणि परिचितांना टॅग करत आहेत.