बहुतेक सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होतात. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असू; पण जेव्हा निवृत्त होण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक माणूस हा भावूक होतोच. परंतु, तुम्ही कधी कोणाला किराणा मालाच्या दुकानातून निवृत्त होताना पाहिलं आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. औरंगाबादच्या एका व्यक्तीनं बाबांच्या कारकिर्दीला सेवानिवृत्तीचं लेबल देऊन त्यांचं कौतुक केलं आहे. कारण- त्यांनी अलीकडेच तीन दशकांपासून कष्टानं चालविलेलं कौटुंबिक किराणा मालाचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकवर बाबांच्या प्रवासाची ही हृदयस्पर्शी गोष्ट लेकराने शेअर केली आहे. बाबा म्हणजेच डॉक्टर वहीद यांचे अब्बा ३३ वर्षांपासून किराणा मालाचं दुकान सांभाळत किंवा चालवत होते. याअगोदर त्यांनी १३ वर्षं पान टपरी सांभाळली. तसेच ईदच्या दोन सुट्या वगळता वर्षातून ३६५ दिवस सकाळी ९ ते रात्री ११ ते किराणा मालाचं दुकान चालवायचे हे सांगताना त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. काय लिहिलं आहे हे एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…VIDEO: उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी मातीची बाटली; पर्यावरणाचे होणार संरक्षण, कामगारांची मेहनत पाहा

पोस्ट नक्की बघा…

वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानानं कुटुंबाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवली आणि कोणत्याही अडचणीशिवाय त्यांनी त्यांच्या लेकराला शिक्षण घेऊ दिलं. ही बाब लक्षात घेऊन लेकरू म्हणाल्या, ‘माझ्या पालकांनी मला योग्य शिक्षण दिलं नसतं, तर मी निश्चितपणे हा व्यवसाय चालू ठेवला असता म्हणून मी दुःखी आणि आनंदी दोन्हीही आहे’ ; असे ते यावेळी म्हणाले.

सोशल मीडियावर ही पोस्ट डॉक्टर वहीद @Waheed Momin यांच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे ; एक सल्लागार न्यूरोलॉजिस्ट आहेत. तसेच लेकराने वडिलांबरोबर किराणा मालाच्या दुकानात उभं राहून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये ‘सर्वात जास्त आवडलेलं काम त्यांना थांबवताना पाहून वाईट वाटतं. आशा आहे की, ते त्यांच्या निवृत्तीचा आणि फुरसतीचा वेळ आनंदात घालवतील आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेतील ; ज्याकडे त्यांनी आमच्यासाठी नेहमीच दुर्लक्ष केलं आहे ‘ असा काही शब्दात त्यांचा हृदयस्पर्शी प्रवास लिहून पोस्ट केला आहे. नेटकरी ही पोस्ट पाहू भावुक होत आहे विविध शब्दात त्यांच्या भावना कमेंटमध्ये मांडताना दिसत आहेत.