कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याच्या नावानेच लोक घाबरतात. मात्र, आज आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी जगाला दाखवून दिले आहे की या आजाराशीही लढता येते आणि जिंकताही येते. आयुष्यात दुःखाच्या अंधारावर काही माणसं मात करतात. त्याच्याकडे दया किंवा सहानुभूतीने बघावे असे त्यांना वाटत नाही. अशाच एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. त्याला कर्करोग आहे आणि केमोथेरपी सत्रादरम्यान तो त्याच्यासमोर लॅपटॉप घेऊन हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला दिसतो. तो नोकरीसाठी मुलाखत (job interview during chemotherapy) देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्यक्तीचे नाव आहे अर्श नंदन प्रसाद. तो मूळचा जमशेदपूर, झारखंडचा आहे. त्याने लिंक्डइनवर आपली कथा शेअर केली. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देण्यासोबतच नोकरीसाठीही झगडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सहानुभूतीची गरज नाही

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, या आजारपणात मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. त्यापेक्षा त्याला जगासमोर स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असते. नोकरी देणाऱ्या लोकांना जस समजत की मला कॅन्सर आहे तसं त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात.

(हे ही वाचा: Karachi University Blast: कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणारी महिला होती उच्चशिक्षित; प्राणीशास्त्रातमध्ये घेतली होती मास्टर डिग्री)

नोकरी मिळाली

अर्शच्या पोस्टवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. लोकांनी धाडसाचे कौतुक केले. अगदी महाराष्ट्रातील एका कंपनीच्या सीईओ नीलेश सातपुतेने (Nilesh Satpute) त्यांना थेट नोकरीची ऑफर दिली. ते लिहतात, ‘तुम्ही योद्धा आहात. कृपया उपचारादरम्यान मुलाखत देऊ नका. मी तुमचा सीव्ही पाहिला आहे. तुम्ही खूप मजबूत आहात. तुम्ही कधीही जॉइन होऊ शकता, मुलाखतीची आवश्यकता नाही.

(हे ही वाचा: कराची विद्यापीठामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचं ट्विट viral, “तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला…”)

(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

यूजर्स झाले प्रेरित

काही वापरकर्त्यांनी त्याला कॅन्सरशी लढण्यासाठी धीर दिला. त्याच वेळी, काही वापरकर्ते त्याची कथा ऐकून प्रेरित झाले. तर अर्श नंदन प्रसादची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटतेय?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sits for job interview during chemo session in hospital his story goes viral ttg
First published on: 27-04-2022 at 16:04 IST