हल्ली तरुणांमध्ये सेल्फीची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. पण बऱ्याचदा हा सेल्फीचा नाद त्यांना फार जीवघेणा ठरू शकतो. लोक सेल्फीच्या नादात आपली जीव सुध्दा धोक्यात घालतात. त्यामुळे फोटो महत्वाचा की, जीव महत्वाचा असा प्रश्न सहाजिकच पडतो. सेल्फी काढण्याचे वेड अनेकांना महागात पडले आहे. आता सेल्फी काढण्याच्या नादात कित्येकांनी जीव गमावले तर कित्येकाने हात पाय मोडून घेतले अशा बातम्या रोजच वाचण्यात येतात. या सेल्फीच्या नादात अनेक वेळा जीवही गमवावा लागला आहे. सेल्फी काढताना डोंगरावरून पडून आणि ट्रेनला धडकून लोकांचा मृत्यू झाला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या फार व्हायरल होत आहे.

हेलिकॉप्टरजवळ सेल्फी काढणाऱ्या तरुणाला धू-धू-धुतला

अनेक वेळा सेल्फी काढल्यामुळे इतरांना अडचणींना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केदारनाथचा असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे हेलिपॅडजवळ एका व्यक्तीने हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला अशी अद्दल घडवली की, पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. खरंतर या हेलिपॅडवर एक हेलिकॉप्टर टेक ऑफ करायच्या तयारीत होतं, यावेळी एक तरुण त्याच्या जवळ जातो आणि सेल्फी काढू लागतो.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग

पायलटचं लक्ष गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला

दरम्यान हेलिकॉप्टर हवेत उडणार तेव्हाच पायलटची नजर त्या तरुणावर पडते. पायलट हेलिकॉप्टर परत स्थिर करतो. त्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने धावत येऊन सेल्फी काढणाऱ्या तरुणाला चापट मारली आणि ढकलून दिले. त्यानंतर तो तरुण तेथून पळू लागतो. थोडं अंतर चालवल्यावर आणखी पोलीस आपल्या मागून येतो त्याला लाथा मारतो. थोड्याच्या चुकीने सेल्फीच्या नादात मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा व्हिडीओ केदारनाथचा असल्याचं सागिंतलं जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: दादागिरी संपेना! मी कोण आहे माहित आहे का? म्हणत तरुणांकडून कार चालकाला मारहाण

या अशा अतिशाहणपणा करणाऱ्या तरुणांमुळे मोठ मोठया दुर्घटना घडतात. तरीही हे त्यातून धडा घेत नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरीही संतापले आहेत.