पर्यावरण संवर्धनाची खिल्ली उडवत उंच डोंगर कड्यावरून फ्रीज ढकलुन देणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. त्या व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा तो फ्रीज डोंगरावर आणायला लावला. हा फ्रीज वर आणताना त्यांचे प्रचंड हाल होताना दिसत असुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पर्यावरणासाठी पुर्नवापर करण्याच्या नियमांची मस्करी करणारी व्यक्ती स्पेनमधील अल्मेरिया प्रातांतील असुन घरगुती वस्तुंची विक्री करणाऱ्या कंपनीत काम करतो. वस्तुंच्या पुर्नवापराविषयी थट्टा करताना हा व्यक्ती डोंगराच्या उंच कड्यावरून फ्रीज फेकून देताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पॅनिश प्रशासनापर्यंत पोहोचला.


या व्हिडिओच्या साहाय्याने स्पॅनिश गार्डिया शहर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला. त्याला परत फ्रीज फेकलेल्या ठिकाणावर पोलीस घेऊन आले. खोल दरीत फेकून दिलेला फ्रीज परत वर आणण्याची शिक्षा दिली. याचा गंमतीशीर व्हिडिओ पोलिसांनी तयार करुन व्हायरल केला आहे. त्याला नेटकरी हसुन दाद देत देण्याबरोबर पोलिसांचे कौतुक करीत आहे. पर्यावरण गुन्ह्यातंर्गत आता या व्यक्तीला शिक्षा द्यायची की दंड याचा निर्णय न्यायालय घेईल, अशी माहिती पोलीस प्रवक्ते लुईस गोन्झालेज यांनी दिली.