scorecardresearch

Viral Video: पठ्ठ्यानं जिवंत नागावर बंदुकीची गोळी झाडली, निशाणा चुकल्यावर नाग थेट अंगावर धावला अन्….

जीवंत नागावर बंदुकीची गोळी झाडणं एका व्यक्तीच्या अंगटल आलं, पाहा थरारक व्हिडीओ

Viral Video: पठ्ठ्यानं जिवंत नागावर बंदुकीची गोळी झाडली, निशाणा चुकल्यावर नाग थेट अंगावर धावला अन्….
एका व्यक्तीने नागावर बंदुकीची गोळी झाडली. (Image-twitter)

Cobra attacked man viral video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्साठी पाळीव प्राणी, साप यांच्यासोबत खेळ करून ते व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज अनेक प्रकारचे थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. स्वत:च्या आणि लोकांच्या मनोरंजनासाठी काही जण विनाशकाले विपरीत बुद्धीचा वापर करतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका पठ्ठ्यानं चक्क जीवंत नागावर बंदुकीची गोळी झाडली. पण त्याच्या निशाणा चुकल्यावर नाग थेट त्यांच्यावर अंगावर धावला. ही थरारक दृष्ये कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नागाने या तरुणाला शिक्षा देण्यासाठी ठाम निर्धारच केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

….अन् नागावर गोळी झाडणं तरुणाच्या अंगटल आलं

जशी कर्म कराल, तसंच फळ मिळतं, असं म्हणतात. ते सत्यच आहे. कारण नागाची छेडछाड करायला गेलेल्या तरुणाला नागाने चांगलीच अद्दल घडवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कारमध्ये बसलेला एक व्यक्ती नागावर बंदुकीचा निशाणा लावतो. पण दोन गोळ्यांचा निशाणा चुकल्यावर चिडलेला नाग थेट त्याला चावण्यासाठी धावतो. त्यानंतर तो व्यक्ती त्याठिकाणाहून पळ काढतो. आपल्या जीव वाचल्यानंतर नागानेही त्या तरुणाला डसण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नागाने हल्ला केल्यावर तरुणाची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. जोरजोरात ओरडून तो तरुण नागासोबत मस्ती करणं सोडून देऊन त्या ठिकाणाहून पळून जातो.

नक्की वाचा – नाद केला या पोरानं! टी शर्ट काढलं अन् चक्क मगरींच्या कळपातच मारली उडी, मगर अंगावर चढल्यावर काय घडलं? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

@Instantregretss नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 176.6 k व्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एक रस्त्यावर नाग बसल्याचं या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं. याचदरम्यान नागाच्या बाजूला एक कार येऊन थांबते. या कारमध्ये असलेला व्यक्ती बंदूक काढून नागावर निशाणा लावतो. दोन वेळा गोळ्या झाडल्यानंतरही निशाणा चुकतो. त्यानंतर चिडलेला नाग थेट त्या व्यक्तीच्या अंगावर धावतो. त्यानंतर नागाची शिकार करायला आलेला व्यक्ती नागाला घाबरून पळून जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 11:32 IST

संबंधित बातम्या