तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. तरीही काही लोकांचं व्यसन काही सुटत नाही. अगदी मरणाच्या दारात पोहोचेपर्यंत त्यांचं व्यसन सुरु असतं. सध्या एक विचित्र प्रकार समोर आलाय, त्यामध्ये एक व्यक्ती ऑपरेशन थिएटरमध्ये असून तिच्यावर उपचार सुरु आहेत मात्र तरीही ती तंबाखू मळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडीओ बघून तुम्हीही डोक्याला हात माराल.

व्हायरल व्हिडिओमध्ये रुग्णाला ऑक्सिजन मास्क घातलेला आहे आणि त्याचे बोट पल्स ऑक्सिमीटरला जोडलेले आहे. दोन परिचारिका वैद्यकीय प्रक्रियेची तयारी करत असताना तो त्याच्या तळहातावर तंबाखू मळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आयसीयू दिसत आहे आणि एक पेशंट बेडवर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची परिस्थीती क्रिटिकल असूनही त्याचं व्यसन सुटण्याचं नाव घेत नाही. तो ऑपरेशन थिएटरमध्येही दोन हातांनी तंबाखू मळतोय.व्हिडिओमधील रुग्णाच्या हातात खरच तंबाखू आहे की त्याला भास होतोय हे स्पष्ट झालेलं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वो स्त्री है कुछ भी कर सकती है! नवऱ्याला गटरात बुडवून बुडवून मारला; Video झाला व्हायरल

युजर्सच्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स यावर केल्या आहेत. यावर एका युजर्सने लिहिले आहे की, “मृत्यूच्या दारातही तंबाखू सुटत नाही’, तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘यांना हातात सोन्याची वाटी दिली तरी हे लोक भिकचं मागणार.” तर एका युजर्सने लिहिलं आहे की, “आम्हालाही थोडं द्या.” या व्हिडीओला सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

खरं तर तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदय विकार आणि इतर अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानाच्या संवयीपासून सुटका करणं तसं फार अवघड आहे. पण तुम्ही निश्चय केला तर सर्व शक्य आहे.