अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना आनंदी ठेवण्यासाठी कार्यक्रमांचे, पार्ट्यांचे आयोज करतात. मात्र, एका कंपनीला या गोष्टी तिच्या कर्मचाऱ्यावर लादणे महागात पडले आहे. पॅरिस येथील न्यायालयाने एका फ्रेंच व्यक्तीला बोर होण्याचा अधिकार (Right to be boring) बहाल केला असून इतर कर्मचाऱ्यांबरोबर कामानंतरच्या पार्टीमध्ये सहभाग न घेण्याच्या कारणातून कामावरून काढणे चुकीचे असल्याचा निर्वाळा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित व्यक्ती पॅरिसमधील सल्लागार कंपनी क्युबिक पार्टनरमध्ये वरिष्ठ सल्लागार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिस्टर टी म्हणून ही व्यक्ती या प्रकरणाला पुढे गेली. मिस्टर टी हे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी संस्थेच्या मौजमेजेच्या क्लपनेशी सहमत नव्हते. यात आठवड्यातून एकदा पेय पार्टी करण्यासाठी जाण्याचा समावेश होता.

(शिक्षिकेने अतिशय मजेदार पद्धतीने गिरवले ज्ञानाचे धडे, विद्यार्थीही झाले खुश, पाहा व्हिडिओ..)

२०१५ मध्ये नियोक्त्याने मिस्टर ‘टी’ने टीमवर्कला चालण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कामानंतरच्या पेय पार्टी क्रियेत भाग घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यात व्यायसायिक अपुरेपणा असल्याचे सांगत कामावरून काढून टाकले. मिस्टर टी ही कंटाळवाणी व्यक्ती असून तिच्यासोबत काम करणे कठीण होते आणि ती ऐकत नाही, असेही कंपनीने सांगितले.

यावर न्यायालयात मिस्टर ‘टी’ ने आपल्याला गंभीर वर्तन (critical behaviour) आणि कंपनीच्या आवश्यकतेपेक्षा अधिक कामांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्याच्या धोरणाला नकार देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच, कंपनीच्या मजामस्तीच्या (fun) व्याख्येशी आपण सहमत नसल्याचेही ‘मिस्टर टी’ ने म्हटले.

(झोमॅटोने मजेदार मिम शेअर करून सांगितली ट्विटरची परिस्थिती, नेटकऱ्यांनीही दिला प्रतिसाद)

पॅरिस येथील कोर्ट ऑफ कॅसेशन देखील त्याच निष्कर्षावर पोहोचले. न्यायालयाने ७ वर्षे चाललेल्या या खटल्यावर निर्वाळा देत ‘मिस्टर टी’च्या नियोक्त्याला त्यांना २.५ लाख रुपये देण्याचे आदेश दिला. न्यायालयाने सांगितले की, प्रत्येकाला सेमिनार आणि आठवड्याच्या शेवटी घेण्यात येणाऱ्या पेय पिण्याच्या पार्ट्यांमध्ये सहभाग घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, ज्याची वारंवार अल्कोहोलच्या सेवनाने सांगता होते.

कपनीचे सामाजिक कार्यक्रम आणि मजा (fun) यावर भर देणे हे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याच्या खाजगी जीवनाचा आदर करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते, असे देखील न्यायालयाने म्हटले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man win legal battle to be boring at work after fired by employer for not being fun enough ssb
First published on: 27-11-2022 at 19:31 IST